वरठी येथील अतिक्रमणावर जेसीबी व पोकेलँड चालला. प्रशासनाने संधी न देता चालवीला मोगलशाही हंटर. सीमांकनाच्या दिवशीच अतिक्रमण काढल्याने गोंधळ
Summary
प्रतिनिधी मोहाडी :- जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशन असलेल्या भंडारा रोड वरठी रेल्वे स्थानकासमोर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर जेसीबी व पोकलँड चा मारा करून उध्वस्त करण्यात आले. अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा चार-पाच दिवसाआधी सर्वांना दिल्या होत्या. याबाबत सर्व अतिक्रमण धारकांनी सहकार्य केले. यावेळी […]

प्रतिनिधी मोहाडी :- जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशन असलेल्या भंडारा रोड वरठी रेल्वे स्थानकासमोर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर जेसीबी व पोकलँड चा मारा करून उध्वस्त करण्यात आले. अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा चार-पाच दिवसाआधी सर्वांना दिल्या होत्या. याबाबत सर्व अतिक्रमण धारकांनी सहकार्य केले. यावेळी प्रशासनाने शासकीय जागेबाबत कुठलेही सीमांकन केले नव्हते. मात्र अचानक दिनांक २८ फेब्रुवारीला प्रशासनाने सकाळी सीमांकन करीत मोगलशाही हंटर चालवावयास सुरुवात केली. सीमांत निश्चित झाल्याने दोन-चार दिवस अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याची संधी द्यायला हवी होती. मात्र प्रशासनाच्या या मोगल शाही कारभारामुळे सर्वत्र गोंधळ दिसून आला. गावकऱ्यांनीही याबाबत रोष व्यक्त केला. यावेळी उपविभागीय अधिकारी तहसीलदार व पोलिसांचा मोठा फौज फाटा दिसून आला.
जिल्ह्याच्या नावाने भंडारा रोड वरठी गावाची ओळख आहे. मात्र येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण पसरल्याने गावाची भयावह अवस्था दिसून येत होती. गावाचे सौंदर्य करण करण्यासाठी स्थानिक आमदार राजू कारेमोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यातून सौंदर्यकरण करण्यासाठी जवळपास २३ कोटी रुपये मंजूर करून घेतले. जगनाडे चौक ते बस स्टॉप आणि आंबेडकर चौक ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत सौंदर्य करण करण्याचे काम होणार आहे. यात सर्वात मोठा अडसर म्हणजे वरठी येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणांची तारांबळ उडाली. यामुळे व्यापाऱ्यांत मोठ्या प्रमाणात गोंधळ दिसून आला. सीमांकन चुकीचे असल्याचेही अनेकांची आरडाओरड सुरू होती. यावेळी तुमसर चे उपविभागीय अधिकारी तहसीलदार बांधकाम विभाग भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी यांनी कोणाचेही ऐकून न घेता अतिक्रमण जमीनदोस्त केले. यातून प्रशासनाचे मोगलशाही धोरण पुढे आले आहे. यावेळी वरठी पोलीस ठाणेदार अभिजीत पाटील यांनी मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. यात 30 पोलीस व १० महिला पोलिसांचा समावेश होता. गावकऱ्यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य केल्याबद्दल ठाणेदार यांनी सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले.
महत्त्वाचे म्हणजे रस्त्याच्या कडेला मोठमोठ्या झाडाचे वृक्षारोपणही होणार आहे. त्यामुळे भविष्यात वरठी गावाला भव्यरूप मिळणार आहे. एकंदरीत आमदार राजू कारेमोरे यांच्या “न भूतो, न भविष्यती”, अशा करोडोच्या निधीतून गावाचा चेहरा मोहरा बदलणार आहे हे मात्र निश्चित.