नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

जल जीवन मिशन स्पर्धेत ला. भु विद्यालयाने मारली बाजी

Summary

प्राथमिक व माध्यमिक गटातील निबंध स्पर्धेत प्रथम व द्वितीय- पारितोषिक कोंढाळी=(प्रतिनिधी) जल जिवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद नागपूर चे वतिने जिल्हा शालेय स्तरावर प्राथमिक व माध्यमिक या दोन गटात निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन […]

प्राथमिक व माध्यमिक गटातील निबंध स्पर्धेत प्रथम व द्वितीय- पारितोषिक
कोंढाळी=(प्रतिनिधी) जल जिवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद नागपूर चे वतिने जिल्हा शालेय स्तरावर प्राथमिक व माध्यमिक या दोन गटात निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत प्राथमिक गटात वर्ग सहा ते आठ व माध्यमिक गटात वर्ग नउ ते बारावी या स्तरावरील विद्यार्थांची तालुका स्तरीय स्पर्धा घेण्यात आली, या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांची जिल्हा स्पर्धे करिता निवड करण्यात आली. या स्पर्धेत कोंढाळी येथील लाखोटिया भुतडा विद्यालयातील माध्यमिक गटात जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान कु. चारूल दिनेश नासरे हीने मिळविला तर प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक येथिल कुमारी कृतिका विशाल राउत ही पटकावून दुहेरी सन्मान मिळवून त्यांना आज दि. २१/२/२४ ला नागपूर येथील वनामती येथे जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकर्डे , उपाध्यक्ष जि. प. नागपूर कुंदा राऊत, मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा, प्रकल्प संचालक जल जिवन मिशन कुणाल उंदिरवाडे व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग उमल चांदेकर व मान्यवरांचे हस्ते माध्यमिक गटातील निबंध स्पर्धेत प्रथम आलेल्या चारूल नासरे हिला एकविस हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र , तर प्राथमिक गटात वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय आलेल्या कृतिका विशाल राऊत हीला अकरा हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. शाळेला दुहेरी सन्मान मिळवून देना-या दोन्ही विद्यार्थींनींचे शाळेचे व्यवस्थापक अध्यक्ष राजेश राठी, सचिव श्यामसुंदर लद्धड, प्राचार्य सुधीर बुटे , उपप्राचार्य कैलास थूल, निबंध स्पर्धा प्रमुख नेहारे मॅडम सर्व समिती , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. दुहेरी सन्मान मिळविने ही गाव शाळेसाठी अभिमानाची बाब असून या मुळे विद्यार्थी विविध विषयात पारंगत होवू त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी शाळा व विविध स्पर्धा ह्या गरजेच्या असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *