नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्कृतीक सभागृह भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न – हजारोच्या संख्येत कुणबी बांधवांची उपस्थिती – सभागृह उभारणीकरिता आणखी 10 कोटी निधी देण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा.

Summary

काटोल- प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे काटोल शहरात कुणबी सेवा संघाच्या वतीने कुणबी समाज भवणाची मागणी गेल्या अनेक वर्षा पासून होती अखेरीस हा सुवर्णक्षण बुधवारला डोंगरगावं येथे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृह व कौशल्य विकास केंद्राचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

काटोल- प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे

काटोल शहरात कुणबी सेवा संघाच्या वतीने कुणबी समाज भवणाची मागणी गेल्या अनेक वर्षा पासून होती अखेरीस हा सुवर्णक्षण बुधवारला डोंगरगावं येथे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृह व कौशल्य विकास केंद्राचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व हजारो कुनबी बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषि बाजार समितीचे माजी सभापती केशवराव डेहनकर, सत्कारमूर्ती डॉ परिणय फुके, प्रमुख उपस्थितीत आमदार  चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल देशमुख, माजी मंत्री सुनिल केदार, माजी आमदार डॉ आशिष देशमुख, खासदार कृपाल तुमाने, बबनराव तायवाडे, सुरेश गुडधे, जानराव केदार, राहुल देशमुख, कुणबी सेवा संस्थेचे अध्यक्ष रमेश फिस्के,  ग्राम पंचायत डोंगरगाव सरपंच हिमांशू बाविस्कर, सचिव मुकेश भैस्वार व्यासपीठावर उपस्थित होते.

 अभिमान आणि स्वाभिमान तुकाराम महाराज यांनी दिला आहे.  कुणबी सेवा संस्था चांगले काम करीत आहे. कौशल्य विकास केंद्र व सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामाकरिता अडीच कोटी देण्यात आले आहे.  वास्तूला सांस्कृतिक भवनापुरते मर्यातीत न ठेवता यावास्तुत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र  उभे होत आहे. बांधवांच्या मागणीवरून पुन्हा 10 कोटी रुपये देत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लवकरच या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी देवेंद्र फडणवीस व अजित पवार,  आम्ही तिघे लवकरच वास्तूच्या भूमिपूजन सोहळाला येऊ अशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्वाही दिली.

कुणबी सेवा संस्थेची मागणीची पूर्तता करण्याकरिता आमदार परिणय फुके यांनी केलेले प्रयत्न मोलाचे असल्याने आमदार फुके यांचा कुणबी सेवा संस्था काटोल-नरखेडच्या  वतीने सत्कार करण्यात आला. तसेच ग्राम पंचायत डोंगरगाव सरपंच हिमांशू बाविस्कर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. 

या सांस्कृतिक सभागृह व कौशल्य विकास केंद्रामधून स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अनेक जण प्रशिक्षित होऊन रोजगार प्राप्त करण्यास मदत होईल. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार डॉ. परिणाय फुके यांनी यावेळी कुणबी बांधवाना संबोधून आपले मत मांडले.

 संस्थेचे कार्य, संस्था राबवित असलेले उपक्रम, याबाबतची माहिती कुणबी सेवा संस्थेचे अध्यक्ष रमेश फिस्के यांनी प्रस्तविकातून दिली. आभार संस्थेचे संघटक प्रशांत अर्डक यांनी मानले. संचालन श्रीमती शीप्रा मानकर यांनी केले. प्रारंभी  समाज जनजागृती करिता विध्यराज कोरे महाराज यांचे कीर्तन झाले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनाने झाली. कार्यक्रम यशस्वीतेकरिता कुणबी सेवा संस्था काटोल नरखेडचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ तसेच सर्व सदस्य व सर्व समाज बांधवानी संचालक सुरेश महल्ले, स्वप्निल राऊत, प्रशांत अर्डक, विजय धोटे, सुधाकर सांभारतोडे, अशोकराव काकडे, गुणवंतराव भिसे, विठ्ठलराव काकडे, सूर्याजी राऊत, दीपक केने, दिनकरराव राऊत, रमेश पोतदार, संजय भोंडे, सौ. रेखा मोहोड, सौ. कांता अडकने, रत्नाकर बोन्द्रे, सुरेश पाबळे, राजू डेहनकर, समीर उमप, नितीन डेहनकर, राजू हरणे, प्रशांत पाचपोहर, मनीष फुके, नितीन धोटे, अजय ठाकरे, राजू हरणे, रमेश पेठे, गौरव पोतदार, अमोल आरघोडे, बाबा फिस्के, नामदेव काळमेघ, माधव अनव्हाणे, पुण्यवान अडकणे, राहुल फिस्के, कांचनताई फिस्के, जयताई बोरकर, कविता काळे, लता कडू, शुभांगी अर्डक, रवी वैद, प्रविण लोहे,  दिलीप घारड, निशिकांत नागमोते, मंगेश माळवी, दीपक डांबले, नारायण काळे, सौरभ ढोरे, चेतन ठाकरे, प्रशांत रिधोरकर, राजेश धवड, भडागे सर, सुनील ठाकरे व ग्राम पंचायत डोंगरगावचे सरपंच हिमांशू बाविस्कर, उपसरपंच व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *