कृषि महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

लिंबूवर्गीय फळपिकांसाठीच्या तीन सिट्रस इस्टेटसाठी ७ कोटींचा निधी

Summary

मुंबई, दि. 12 : जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका उमरखेड, अमरावती, सिट्रस इस्टेट, धिवरवाडी, नागपूर, सिट्र्स इस्टेट तळेगाव, वर्धा येथील शासकीय तालुका फळरोपवाटिकांमध्ये लिंबूवर्गीय फळपिकांकरिता सिट्रस इस्टेट स्थापन करण्यात आली आहे. या सिट्रस इस्टेटसाठी 7 कोटी 24 लाख 67 हजार रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे.             सिट्रस इस्टेटसाठीच्या या निधीचे वितरण पुढील प्रमाणे होणार आहे. उच्चतंत्रज्ञान  आधारीत रोपवाटीका […]

मुंबईदि. 12 : जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका उमरखेडअमरावतीसिट्रस इस्टेटधिवरवाडीनागपूरसिट्र्स इस्टेट तळेगाववर्धा येथील शासकीय तालुका फळरोपवाटिकांमध्ये लिंबूवर्गीय फळपिकांकरिता सिट्रस इस्टेट स्थापन करण्यात आली आहे. या सिट्रस इस्टेटसाठी 7 कोटी 24 लाख 67 हजार रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे.

            सिट्रस इस्टेटसाठीच्या या निधीचे वितरण पुढील प्रमाणे होणार आहे. उच्चतंत्रज्ञान  आधारीत रोपवाटीका स्थापन करण्यासाठी 35 लाख 65 हजार रुपयेत्यापैकी 6 लाख 15 हजार रुपये धिवरवाडी ता.काटोलजि. नागपूरसाठी तर 29 लाख 50 हजार रुपये तळेगाव ता. आष्टी. जि. वर्धासाठी वितरित करण्यात येणार आहे. उमरखेडता. मोर्शीजि. अमरावती येथील सिट्रस इस्टेटसाठी प्रशासकीय इमारत बांधकामकार्यालयप्रयोगशाळा, प्रशिक्षण भवननिविष्ठा विक्री केंद्र इत्यादीसाठी 1 कोटीतिन्ही सिट्रस इस्टेटमध्ये अवजारे बँक स्थापनेसाठी 2 कोटी 14 लाखमातीपाणीउती व पाने चाचणी प्रयोगशाळा आणि जिवाणू खते उत्पादनासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी 3 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

            या सिट्रस इस्टेटचे कृषी आयुक्तालय स्तरावर कृषी आयुक्तपुणेविभाग स्तरावर विभागीय कृषी सहसंचालकअमरावतीनागपूर आणि छत्रपती संभाजी नगर आणि जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीअमरावतीनागपूरवर्धाछत्रपती संभाजी नगर हे सनियंत्रण करणार असल्याचे कृषीपशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने कळविले आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *