मि योद्धा भिमा कोरेगावचा नाट्यप्रयोग बारव्हा येथे १ जानेवारीला

लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील बहुजन एकता मंच बारव्याच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा हे थिएटर्स सिंदेवाही वडसा प्रस्तुत मी योद्धा भीमा कोरेगावचा या नाट्यप्रयोगाचे आयोजन सोमवार दिनांक १ जानेवारी २०२४रोजी रात्री ९:३०वाजता बारव्हा गेट जवळील भव्य पटांगणावर करण्यात आले आहे.
या नाट्यप्रयोगाचे उद्घाटक बाबुराव फुले ,सौ, सहउद्घाटक प्रा.डाॅ.कल्पना सांगोळे( नंदेश्वर) सुरेश मेश्राम अध्यक्ष डॉक्टर अनिरुद्ध रंगारी तहसीलदार अखिल भारत मेश्राम प्रा.मिथुन खुशाल सोनटक्के श. दै.जुनिअर कॉलेज बारव्हा तर प्रमुख पाहुणे ठाणेदार हेमंत पवार , एम, एस, खुणे,सभापती रंजना वरखडे,मनोज दामले ,सुवर्णा बोरकर ,अभियंता दिनेश गाढवे ,किशोर पटले ,सा.कार्य, निलिमा मेश्राम बारव्हा,इंजिनियर महेश मुळे, अर्पणा जांगळे, विलास मेश्राम ,कमलेश बोरकर ,गणेश सोनपिंपळे,मोहन चुन्ने श्रीहरी भेंडारकर उपस्थित राहणार आहेत.
यादरम्यान सत्कारमूर्ती म्हणून डॉ. सविता मालडोंगरे धारगाव ,चेंडबा रामटेके औरंगाबाद, वामन वझडे, राकेश झोडे, संजय झोडे, डॉ. सचिन झंझाड डॉ.होमराज मडावी ,डाॅ.मंगेश भेंडारकर ,यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
नाट्यप्रयोगाच्या तत्पूर्वी छत्रपती शिव फुले शाहू ,आंबेडकर ,चळवळीचा जलसा अमोल राऊत व विमीत दहिवले ,यांच्या संचासहित सरगम फांउडेशन प्रस्तुत संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ५ ते ९ वाजेच्या दरम्यान करण्यात आले आहे, या कार्यक्रमाचे उद्घाटक विघेकर जांगळे,प्रा.एस, के. शेंडे ,अभिमन चौधरी, अध्यक्ष इंजिनिअर सुरेश भऱै ,एस, एस ,बांबोळे डॉ.नंदेशर प्रमुख पाहुणे सचिन बडोले, फतु लोथे, प्रा. स्वप्निल वासनिक सर,अमित रंगारी ,दिनेश मेश्राम ,यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शौर्य दिनाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान मोटारसायकल रॅली ची सुरुवात ८ वाजता आनंद बुद्ध विहारातून होऊन मानेगाव , मुरमाडी , दिघोरी मार्गे कार्यक्रम स्थळी समारोप होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान बहुजन एकता मंच बारहा च्या वतीने करण्यात आले आहे.