संमोहना मुळे सूप्तकलेचा विकास साधला जातो -: संमोहनतंज्ञ डॉ. जगदिश राठोड
पुणे – नुकतेच पुणे येथे सजनाबाई भंडारी विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्मरणशक्ती विकास व एकाग्रता साधण्यासाठी संमोहनतंज्ञ डॉ. जगदिश राठोड यांनी संमोहन कार्यशाळा घेतली व संमोहन स्टेज शो घेतानी आपले मत व्यक्त करतांनी म्हणाले, कि संमोहना मुळे सूप्तकलेचा विकास साधला जातो.
सविस्तर वृत्त असे कि सजनाबाई भंडारी विद्यालय पानमळा रुबी हॉल जवळ येथे संमोहन प्रात्यक्षिक कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एडके आर. बी. हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थानापन्न झाले होते. संमोहनतंज्ञ डॉ. जगदिश राठोड व समुपदेशिका जयश्री राठोड यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे स्मरणशक्ती विकास व एकाग्रता कशी वाढावी याबाबत मार्गदर्शन करून विविध प्रात्यक्षिक घेतले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून अभ्यासातील रुची वाढविण्यासाठी काही तांत्रिक बाबी सांगितल्या व त्यानंतर संमोहन स्टेज शो घेत असताना विद्यार्थ्यांमधील सूप्त कला, गायन, वादन, नृत्य व विविध नकला संमोहित विद्यार्थ्याकडून करून घेतल्या. याप्रसंगी विविध प्रकारचे भ्रम सांगताना, स्पर्श, गंध, दृष्टी व चविविषयीचे भ्रम प्रात्यक्षिकादवारे समजावून सांगितले. तसेच ताणतणाव,चिंता,भीती,टेन्शन,नैराश्य,उदासीनता अशा विविध समस्या दूर करून आत्मविश्वास कसा वाढवावा याबद्दल मार्गदर्शन केले. शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन कसे लावावे, केलेला अभ्यास लक्षात कसा ठेवावा, वेळेवर कसे आठवावे व परीक्षेत कसे लिह्वावे याबाबत प्रात्यक्षिकादवारे समजावून सांगितले. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच शाळेतील विद्यार्थी व परिसरातील प्रेक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते.