वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळशाच्या मागे किमान पाच रोपे लावावीत- मंत्री सुधीर मुनगंटीवार
नागपूर, दि १९ : चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळसा उत्खनन केल्यास किमान ५ रोपे लावावीत. तसेच खाणी जवळील गावांमधील वीज आणि पाण्याची बिले कंपनीने भरावीत, अशा सूचना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
नागपूर येथे वेस्टर्न कोल फिल्डविषयी विधानभवनात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी वेस्टर्न कोल फील्डचे अधिकारी, जमीन अधिग्रहित होणाऱ्या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्य शासन आणि स्थानिक नागरिक कंपनीला सहकार्य करत असल्याचे सांगून वन मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले , ज्या गावांमधील जमीन कंपनी घेत आहे, तेथील जमीन अधिग्रहणाबाबत तहसीलदार यांचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कोळसा मंत्री, केंद्रीय कोळसा सचिव आणि कोल इंडिया यांना पाठवावा. या अहवालातून अधिग्रहणाविषयीचे गावांचे प्रश्न मार्गी लागतील.
०००००