काटोल -नागपूर मार्गावर भिषण दुर्घटना सोनखांब -ताराबोडी शिवारातील घटना भिषण दुर्घटनेत मेंढेपठार (बाजार)येथील सहाजण मृत मेंढेपढार व लगतच्या परिसरात शोक कळा एकाच वेळी सहा शवयात्रा गावकऱ्यांना अश्रू अनावर
कोंढाळी -/काटोल
१६डिसेंबर चे रात्री ०१वाजताचे दरम्यान काटोल -नागपूर मार्गावर मौजा सोनखांब व ताराबोडी चे मधोमध मार्गावर ट्रक -कॉलीस कार चे भिषण धडकेत कॉलीस मधील सहाजनांचा मृत्यू झाला असून एक इसम अत्यंत गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.
या घटनेची ची हकिकत अशी की नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीच्या लग्न प्रसंगी नागपूर येथे स्वागत समारंभ आटोपून कॉलीस कार क्र.एम एच ३१-बी डब्लू-११११ने आपल्या गावी मेंढेपठार कडे परत येत असताना सोनखांब -ताराबोडी शिवारात पोहोचले असला काटोल वरून नागपूर कडे जाणारा ट्रक क्र एम एच ४०-ए के -३८१७ ने कॉलीस कार ला जबरदस्त धडक दिली झाली या भयंकर धडकेत कॉलीस कार चाक्कचूर झाली या कॉलीस मधील मयुर मोरेश्वर इंगळे,(२२), विठ्ठल थोटे(४२),अजय दशरथ चिखले(४०),वैभव चिखले (३०), रमेश ओमकार हेलोंडे,(५३),सुधाकर रामचंद्र मानकर (५२) हे जागीच ठार झाले तर जगदिश ढोणे ह्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच काटोल पोलीस घटनास्थळी पोहोचून काटोल -नागपूर मार्गावरील जाम ट्राफिक सुरू केले , या घटनेची माहिती मिळताच मेंढेपढार, तसेच लगतचे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या दुर्दैवी घटनांमुळे मेंढेपढार व परिसरात शोककळा पसरली .
मेंढेपढार या गावातून सहा अंतयात्रा एकाच वेळी काढण्यात येऊन सर्वांना येथील मुख्य चौकात अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आल्या यानंतर येथील मोक्षधामावर पोहच्यावर दोघांना मुखाग्नी तर चारजणांना आप आपल्या जाती -धर्मपंथानुसार दफन करण्यात आले.
माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख प्रमुखतेत शोकसभा घेऊन सर्व मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी, प्रविन जोध, सलील देशमुख,संजय डांगोरे,राजेद्र हरणे, निशिकांत नागमोते, काटोल चे एस डी ओ शिवराज पडोळे, या प्रसंगी काटोल, नरखेड तालुक्यातील राजकिय, सामाजिक पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने उपस्थित शोकसागराकडू शोकसभा घेऊन सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
घटणास्थळाची पाहणी केली
या प्रसंगी या भागातील आमदार व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, नागपूर जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे, उप विभागीय पोलिस अधिकारी बापूसाहेब रोहम यांनी घटनास्थळी पोहोचून घटणास्थळाची पाहणी ही केली.