लाखांदूर तालुक्यात १२ डिसेंबर रोजी धम्म संमेलन
Summary
लाखांदूर:- सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन लाखांदूर तालुक्यातील बुद्धिस्ट समाज संघर्ष समितिच्या वतिने १२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता पासुन लाखांदूर तालुक्यात धम्म संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनात सकाळी १० वाजताच्या सुमारास तालुकास्तरावरील बुद्ध विहाराच्या बांधकामचे भुमिपुजन […]
लाखांदूर:- सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन लाखांदूर तालुक्यातील बुद्धिस्ट समाज संघर्ष समितिच्या वतिने १२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता पासुन लाखांदूर तालुक्यात धम्म संमेलनाचे आयोजन केले आहे.
या संमेलनात सकाळी १० वाजताच्या सुमारास तालुकास्तरावरील बुद्ध विहाराच्या बांधकामचे भुमिपुजन पञया मेप्ता संघाचे धम्मदुत भदंत संघरत्न मानके व मुंबई येथील संघकारा फाउंडेशनचे भंते प्रशिल रत्न यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळी ११ वाजता पासून धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजताच्या सुमारास धम्म संमेलनाचा शुभारंभ उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचे प्रमुख चंद्र शेखर आझाद (रावन) यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी ॲड. दिलीप काकडे, तर अथिति म्हणून सरसेनानी आनंदराज आंबेडकर, संध्या राजूरकर, रेशम भोयर, अमन कांबळे, दादाराव तागडे व स्वागताध्यक्ष म्हणून लाखांदूर चे तहसिलदार वैभव पवार साहेब उपस्थित राहणार आहेत. रात्री ८ वाजताच्या सुमारास समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाअंतर्गत मुंबई येथील सिमा पाटिल व जा’ली मोर प्रस्तुत आंबेडकरी जलसाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी
उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.