कातलाबोडी येथील गोपालक अमोल मुंगभाते चा वाघाच्या हल्यात मृत्यू गावकऱ्यांचा रोष आमदार अनिल देशमुख यांची घणदाट जंगलात पाच किलोमीटरची पायपीट आमदारांसमक्ष गवकरी व कुटुंबीची मागण्या मान्य केल्यावर मृत देह शवविच्छेदनासाठी वन विभागाच्या ताब्यात
वार्ताहर -कोंढाळी
गोपालक अमोल अंबादास मुंगभाते यांनी चराई साठी जंगलात नेलेली गुरे लवकर परत आले , मात्र अमोल परतला नाही, या करिता गावकऱ्यांनी अमोल मुंगभाते च्या शोध घेण्यासाठी घणदाट जंगल पिंजून काढला.
येथून १८ किमी कातलाबोडी जंगलात गोपालकावर वाघाने हल्ला केल्या मुळे गोपालक अमोलचा मृत घणदाट जंगलात आढळून आला.
कोंढाळी वनपरिक्षेत्रातील मेंढेपठार उपवनातील मरसूर बीट मधील संरक्षित वन कक्ष क्र२१च्या जंगलातील कातलाबोडी येथील २२ वर्षीय गोपालक अमोल अंबादास मुंगभाते १८नव्हेंबरच्या सकाळी ०८ वाजता नेहमीप्रमाणे गुरे चरायला घेऊन गेला असता , दररोज सायंकाळी ०६ वाजता परतणारे गुरे हे शनिवार १८नव्हेंबरला दुपारी ४.३० वाजता परत आले .मात्र! गोपलाक अमोल परतला नसल्याने गावकऱ्यांनी अमोलचा शोध घेण्यासाठी सायंकाळी पाच वाजता जंगल गाठले व घटनेची माहिती कोंढाळी वनाधिकाऱ्याना दिली.
घनदाट जंगलात अमोल चा शोध सुरू झाला ,रात्री १० ते ११ चे दरम्यान या जंगलातील भडभड्या नाल्याच्या बाजूला अमोल चा जेवणाचा डबा , चप्पल, तसेच काठी ,कुर्य्हाड एका झाडा खाली आढळून आली. त्या आधारे गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी त्या परिसरात अमोलचा शोध घेणे सुरू केले. यात काही अंतरावर आमोलचा पैंट,रक्ताचे डाग,केस, व त्याला फरफरड नेत असताना जागोजागी रक्ताचे डाग व हाताचे बोट पडले दिसले. तसेच फरफडत नेल्याच्या खूनाच्या(चिन्हांचे आधारावर ) चा मागोवा घेत घेत जंगलाच्या आतमध्ये अमोलचा मृतदेह रात्री १०-३०ते ११-००वाजता चे दरम्यान दिसून आला. घटनेची माहिती परीसरात वाऱ्यासारखी पसरली,वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविचछेदन साठी ताब्यात घेतल्यावर गावकऱ्यांनी मृतदेह शवविचछेदनासाठी न जाऊ देता रोखून धरला.या प्रसंगी गोपालक अमोल च्या कुटूंबियांना आर्थिक मोबदला, व मोठ्या भावास नोकरी,तसेच वाघाला जेरबंद करण्याची मागणी लावून धरली. घटनेची माहिती माजी गृहमंत्री व या भागाचे आमदारअनिल देशमुख यांना मिळाली.आमदार सकाळीसच कातलाबोडी पोहचले व गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व गावकर्यांच्या रोशाल शांत करण्यासाठी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपवन संरक्षक डॉ भारतसिंग हाडा, यांच्यासोबत चर्चा करून मृतकच्या परिवाराला शासनाच्या नियमानुसार २५ लाख रुपयांची मदत देण्याची सुचना केल्या.त्यात आधी ०५ लाखाचा धनादेश २०नव्हेंबरला मृतक अमोल चे कुटूंबियांना देण्यात येणार असून २० लाख रुपयांचा धनादेश मृतकाच्या वडिलांच्या नावाने बैंकेत जमा करण्याची कबुली वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ भारतसिग हाडा यांनी आमदार अनिल देशमुख व उपस्थित गावकरी यांच्या समक्ष दिली, तसेच मृतकाचे मोठ्या भावाला वनविभागात कामगिरी(रोजंदारी स्वरूपाची) देण्याची लेखी स्वरूपात दिली. तेव्हा गावकऱ्यांनी अमोल चे मृतदेह शव विच्छेदनासाठी वनविभागाच्या ताब्यात दिले.
कोंढाळी वनपरिक्षेत्रात वाघाकडून मानवी हल्याची पहिलीच घटना
कोंढाळी वनपरिक्षेत्रातील उपवन मेंढेपठार, कोंढाळी, घुबडी, व अहमदनगर या उप वनविभा लगतच्या बोर अभयारण्यातील वाघ, बिबट यांचा या भागात नेहमीचा वावर आहे. यात आजपर्यंत एका वर्षात ८२ जनावरांना भक्ष केले आहे. मात्र !मनुष्य हानी झाली नव्हती. १८ नोहेंबरच्या दुपारी कोंढाळी वनपरिक्षेत्रातील मानवी हाल्याची पहिलीच घटना असल्याची माहिती कोंढाळी चे वन परिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांनी दिली. तर १९६२ नंतर कातलाबोडी व या भागात प्रथमच वाघाने गोपालकावर हल्या चढवला व यात गोपालक अमोला ठार केल्याची माहिती वन्यजीव मानव सदस्य उधमसिंग यादव यांनी दिली
वन चौक्या बंद!
या भागाचे आमदार क्षण अनिल देशमुख घटना स्थळी पोहचता कुटुंबीयांचे सांत्वन करीत असताना गावातील युवकांनी समस्यांचा पाढा मांडला यात येथील उपवनात वन चौक्या बंद असून वन कर्मचाऱ्यांची संख्या फारच कमी असल्याने तसेच घनदाट जंगल असल्याने हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ले वाढल्याने येथील गोपालक व शेतकर्यांच्या गोवंशांना व अन्य जनावरांचा फाडशा पाडने नात्यांचे झाले आहे. आता हिंस्र वन्यजीवांचा मानवी हल्ले होऊ लागले आहेत.कातलाबोडी,मुरली,धनकुंड या भागात सर्वाधिक गोपालक आहे त्यांच्या जनावरांच्या सुरक्षेसाठी ट्र्याप कॅमेरा लावावे. अमोल मुंगभाते वर हल्ला चढविलेल्या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करावे, नेहमी करीता वन गस्त वाढवावी,यासारख्या मागण्या वन अधिकाऱ्या समोर मांडल्या गेल्या.या मागण्याना प्राधान्य क्रम देण्यात यावे.या गावकऱ्यांच्या मागणी ला आमदार अनिल देशमुख यांनी वन विभाग चे अधिकार्यां सुचना देण्यात आली.यावर उप वनसंरक्षक डॉ भारतसिंह हाडा यांनी सांगितले की
वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू असून जंगलात पिंजरे लावण्यात आले आहे ,सोबत ट्रैप कैमैरे बसवण्यात आले आहे, वन गस्त वाढविण्यासाठी कोंढाळी वनपरिक्षेत्राधिकारी निशिकांत कापगते यांना सुचना देण्यात आली आहे अशी माहिती वन अधिकारी यांनी आमदार अनिल देशमुख व गावकर्यांच्या समक्ष दिली.
या प्रसंगी गावकऱ्यांना शांत करण्यााठी सरपंच अर्चना खोब्रागडे,नितेश कोवे,धनराज भड,चंद्रशेखर चिखले, जयंत टालाटुले,बंडू राठोड नितेश कोवे, वन्य जीव संरक्षण मानद सदस्य उधमसिंह यादव,तसेच गावचे जन प्रतिनिधी यांनी सहकार्य केले.
आमदार अनिल देशमुख यांची घणदाट जंगलात पाच किलोमीटर ची पायपीट
कातलाबोडी येथील गोपालक अमोल अंबादास मुंगभाते याची वाघाच्या हल्यात मृत्यू मुळे नागरिकांनचा बराच रोष होता. ऐवढ्या रात्री घणदाट जंगलात गावकऱ्यांनी मृतक अमोल चा मृत देह शोधून काढले त्या घटना स्थळाची पाहणी करण्यासाठी व
घटनेची तीव्रता पाहता आमदार अनिल देशमुख यांनीही १९नव्हेंबर चे सकाळी गावकरी , वन व पोलीस विभागा सह कातलाबोडी चे जंगलातील दर्या खोर्यात०5 की मी पायदळ चालून घटणा स्थळ गाठून
कातलाबोडी येथील गोपालक अमोल अंबादास मुंगभाते याची वाघाच्या हल्ला चढविला ठिकाणची पाहणी केली. .येवढ्या रात्री घनदाट जंगलात मृतक अमोल याचे मृत देह गावकऱ्यांनी शोभून काढले याबब्द गावकऱ्यांच्या धाडसाबाबद आमदार अनिल देशमुख यांनी गावकर्यांचे आभार मानले.