प्राथमिक आरोग्य केंद्र वरठी येथे २ डॉक्टर तसेच ५ सिस्टर आणि ३ ब्रदर आणि ४ लॅब टेक्निशियन तसेच २ चपराशी असे एकूण मिळून १६ पदे रिक्त

प्रतिनिधी वरठी
प्राथमिक आरोग्य केंद्र वरठी येथे विविध पदे रिक्त असून ही रिक्त पदे भरण्याकरिता महाराष्ट्र शासनाचे आरोग्य मंत्रालयात पत्रव्यवहार करू अशी माहिती जिल्हा परिषद भंडारा चे डिएचओ डॉ. मिलिंद सोमकुंवर यांनी पोलीस योद्धा न्युज नेटवर्क शी बोलताना माहिती दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र वरठी येथे २ डॉक्टर तसेच ५ सिस्टर आणि ३ ब्रदर आणि ४ लॅब टेक्निशियन तसेच २ चपराशी असे एकूण मिळून १६ पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरात लवकर भरण्यात यावेत म्हणून आपण प्रयत्नशील असून प्राथमिक आरोग्य केंद्र वरठी येथे रात्र पाळत ठेवण्याकरिता १ डॉक्टर, २ सिस्टर, आणि १ ब्रदर तसेच २ लॅब टेक्निशियन १ चपराशी ची आवश्यकता असून दिवसाला आणखी १ डॉक्टर, ३ सिस्टर, २ ब्रदर, २ लॅब टेक्निशियन तसेच १ चपराशी ची आणखी आवश्यकता असून लवकरच ही पदे भरली जातील अशी माहिती जिल्हा परिषद भंडारा येथील डीएचओ डॉ. मिलिंद सोमकुंवर यांनी पोलीस योद्धा न्युज नेटवर्कशी बोलताना दिली.
वरठी येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रात्रीला हिंसाचारामुळे पीडित झालेल्या मुली तसेच महिलांना मेडिकल अर्थात एमएलसी करीता वरठी पोलीस स्टेशन चे महिला पोलीस घेऊन जातात डॉक्टर ची तसेच इतर पदे ही रिक्त असल्यामुळे भंडारा जिल्हा शासकीय इस्पितळामध्ये पोलीस गाडी मध्ये हिंसाचाराने पीडित मुली तसेच महिलांना घेऊन जावे लागते त्यामुळे वरठी पोलिसांवर कामाचा भरपूर व्याप असल्यामुळे पोलिसांचा तसेच पीडित मुली तसेच महीलांचा उगाच वेळ खर्च होतो. व मानसिक तणाव त्याहूनही अधिक होतो. तसेच लवकरात लवकर एमएलसी दाखल न झाल्यामुळे एफआयआर त्वरित दाखल होत नाही व कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची सुद्धा शक्यता दाट असते.
वरठी प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रातील नागरिकांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्याची देखभाल करण्याकरिता प्रस्तुत रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याचे डॉ. मिलिंद सोमकुंवर यांनी सांगितले. वरठी तसेच आसपासच्या गावामध्ये तंबाखू, खर्रा, गुटखा, मोहफुल दारू, देशी दारू, गांजा, चरस, ब्राऊन शुगर, हेरॉईन, कोकेन चे व्यसनी लोकांची संख्या वाढायला लागली असून अशा प्रकारच्या व्यसन हे मानसिक आजारामध्ये मध्ये मोडते तसेच अश्या प्रकारच्या व्यसनी लोकांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. शालेय विद्यार्थ्यांचे अश्या व्यसनांमुळे अभ्यासात खूप नुकसान होते. त्याचप्रमाणे मद्य मांस तसेच तामसी भोजन, मसालेदार, निकृष्ट दर्जाच्या तेलामध्ये तळलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे मूळव्याध, भगंदर, बिपी, शुगर, हृदयरोग, कोलेस्टेरॉल, मायग्रेन, लठ्ठपणा, नपुंसकता, लकवा, वात, पित्त, कफ दोष अश्या प्रकारचे विविध शारीरिक व्याधी होण्याची शक्यता दाट असते. त्याचप्रमाणे अचानकपणे प्रकृती बिघडल्यास लवकरात लवकर डॉक्टर तर्फे तपासणी करणे गरजेचे असते. परंतु वरठी येथील शासकीय दवाखान्यात वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसल्याने वरठी येथील खाजगी डॉक्टरांकडे पेशंटला जावे लागते. वरठी तसेच आसपासच्या गावांमध्ये अनेक बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून पेशंट ची लुटमार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. करीता वरठी येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वरील रिक्त पदांची भरती करण्याकरिता आपण प्रयत्नशील आहोत अशी माहिती जिल्हा परिषदचे डिएचओ डॉ. मिलिंद सोमकुंवर यांनी पोलीस योद्धा न्युज नेटवर्क शी बोलताना माहिती दिली.