उमेद अभियानाचे दिवाळी फराळ मोहत्सव ला सुरुवात
पोंभूर्ना –
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती पोंभूरना अंतर्गत आज दिनांक 07-11-2023 रोज मंगळवरला मेन रोड नगर पंचायत परिसर येथे दिवाळी फराळ मोहत्सव चे उदघाटन मा. सुलभाताई पिपरे नगराध्यक्ष, नगरपंचायत पोभूना यांच्या हस्ते व मा. श्री. अरुण चनफणे सर गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तथा मा. श्री चंद्रकांत निमोड सर तालुका कृषी अधिकारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेद दिवाळी फराळ विक्री केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. ग्रामीण भागातील समूहातील महिलांनी आपली आर्थिक प्रगती करता यावी व आपल्या उत्पादित मालाला/ वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी. या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी दिनांक 07 ते 11 नोव्हेंबर 2023 पर्यंत उमेद फराळ मोहत्सव सुरु करण्यात आले आहे. या फराळ मोहत्सव मध्ये समूहातील महिलांनी विविध खाद्य वस्तू चिवडा, अनारसे, तिळाचे लाडू, शेंगदाणाचे लाडू, बर्फी, मोतीचूर लाडू, सेव, चकल्या, तसेच दिवे, वात, रांगोळी विक्री साठी स्टॉल वर लावण्यात आले होते.
मा. श्री. अरुण चनफने सर गट विकास अधिकारी यांनी सर्व कर्मचारी यांना फराळ मोहत्सव ला भेट देऊन वस्तूंची खरेदी करण्याचे आव्वाहन केले. आज तालुक्यातील आठवडी बाजार दिवस असल्याने मोठी गर्दी दिसून आली. अनेकांनी स्टॉल ला भेट देऊन मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी केली. उदघाटन प्रसंगी मा. श्री. गजानन भिमटे सर तालुका अभियान व्यवस्थापक, स्मिता आडे, तालुका समन्वयक FL, श्री संघर्ष रंगारी, श्री चतुरदास माऊलीकर, श्री सुरेश खोब्रागडे, श्री किशोर माहुरकर यांची उपस्थिती होती. तयार करण्यात आलेल्या फराळ वस्तूंची पॅकेजिंग व विक्री बाबत तालुका कक्ष येथील सर्व कर्मचारी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. सर्व कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक, उद्योग सखी, व इतर कॅडर यांनी सदर प्रदर्शनी यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.