BREAKING NEWS:
महाराष्ट्र

ब्रेकिंग : वर्धा नदीत 3 मुले वाहून गेली : पोहायला गेले पण पात्रात वाहून गेले

Summary

घुग्गुस शहरातील काही अल्पवयीन मुले पोहायला गेली असताना वर्धा नदी पात्रात वाहून गेले असून वाहून गेलेल्या मुलांचे शोधकार्य पोलीस प्रशासनातर्फे सुरु आहे. थोडक्यात माहिती नुसार आज सकाळच्या सुमारास नाकोडा वरून 1 किलोमीटरवर असलेल्या वर्धा नदीवरील चिंचोली घाटावर घुगूस शहरातील पाच […]

घुग्गुस शहरातील काही अल्पवयीन मुले पोहायला गेली असताना वर्धा नदी पात्रात वाहून गेले असून वाहून गेलेल्या मुलांचे शोधकार्य पोलीस प्रशासनातर्फे सुरु आहे.
थोडक्यात माहिती नुसार आज सकाळच्या सुमारास नाकोडा वरून 1 किलोमीटरवर असलेल्या वर्धा नदीवरील चिंचोली घाटावर घुगूस शहरातील पाच मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यापैकी तीन मुले वर्धा नदी पात्रात बुडत जात असल्याचे प्रत्यदर्शी ट्रॅक्टर मालकांना दिसले असता त्यांनी काही सुज्ञ लोकांना याची तात्काळ माहिती देऊन पोलीस ठाणे घुग्गुस ला कळविण्यात आले.

पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असता यामध्ये अनिल गोगला(15)व सुजल वनकर(16) हे दोघे बचावले असून पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन वानखेडे हे मुले नदीत वाहत गेल्याचे वृत्त आहे. पात्रात वाहत गेलेल्या मुलाचे मुलांचे शोधकार्य सुरू आहे.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *