पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा घटक- काटोल उपविभागीय नव नियुक्त पोलीस पाटीलांच्या कार्यशाळेत उपविभागीय पोलिस अधिकारी बापू साहेब रोहम यांचे प्रतिपादन ७५-नवनियुक्त पोलीसांची एकदिवसीय कार्यशाळा
Summary
कोंढाळी /काटोल – प्रतिनिधी — काटोल उपविभागाअंतरगत नवनियुक्त पोलीस पाटील यांच्या कार्यशाळेचे आयोजन सोमवार २५सप्टेबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी काटोल यांच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी काटोल उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालयांतर्गत येणारे काटोल, नरखेड, कोंढाळी, व जलालखेडा पुलीस स्टेशन […]

कोंढाळी /काटोल – प्रतिनिधी —
काटोल उपविभागाअंतरगत नवनियुक्त पोलीस पाटील यांच्या कार्यशाळेचे आयोजन सोमवार २५सप्टेबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी काटोल यांच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी काटोल उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालयांतर्गत येणारे काटोल, नरखेड, कोंढाळी, व जलालखेडा पुलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांचे नव नियुक्त पोलीस पाटलांना त्यांचे कार्तव्य व जबाबदारी याचे मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी काटोल उपविभागीय पोलिस अधिकारी बापूसाहेब रोहम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पोलीस पाटील हा महसूल व गृह विभागाच्या महत्त्वाच्या घटक असून पोलीस पाटलांनी गावातील बारीक-सारीक गोष्टी तसेच आप आपल्या कामात सचोटी व दूर दृष्टी ठेवून काम करावे. जेणेकरून पोलीस पाटलां कडून गावात चांगल्या प्रकारे कायदा सुव्यवस्था तसेच निवडणुकी काळात तटस्थ भूमिका बजावून आपले कर्तव्य पार पाडावे तसेच गावातील छोटे-मोठे गुन्हे व गावातील काही बारीक सारीक हालचालींवर लक्ष देऊन प्रशासनास सहकार्य करावे गावातील सण उत्सव शांततेत साजरा करा भांडण तंटा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या कार्यशाळेचे आयोजन प्रसंगी सांगण्यात आले.
यावेळी उपस्थित ७५पोलीस पाटलांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी भावी काळासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक मेश्राम (काटोल) सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा तीवारी-(नरखेड), सहायक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे (कोंढाळी), सहायक पोलिस निरीक्षक मनोज चौधरी (जलालखेडा) नागपूर (ग्रा.)यांनी ही , काटोल, नरखेड, हिंगणा, व नागपूर ग्रामीण तालुक्यातील नव नियुक्त पोलीस पाटील पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले.