लायन्स क्लबच्या वतीने महिला बचत गटाला रोजगार निर्मितीचे साहित्य वाटप
गडचिरोली जिल्ह्याच्या वर्धापन दिन व लायन्स क्लब गडचिरोलीचे विद्यमान अध्यक्ष सतीश पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लायन्स क्लब गडचिरोली च्या वतीने गडचिरोली तालुक्यातील चांदाला टोला येथील आदिवासी महिलांच्या बचत गटाला रोजगार मिळवून देणारे साहित्य वाटप करण्यात आले. सदर साहित्य हे केटरिंग व्यवसायातील असून यामुळे या बचत गटातील अशिक्षित अर्धशिक्षित व सुशिक्षित बेरोजगार महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे. यावेळी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये प्रबंधक म्हणून काम केलेले लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पद्मावार व शांतीलाल सेता यांनी महिला बचत गटासाठी राष्ट्रीयकृत बँका मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना विषयी माहिती उपस्थित महिलांना दिली. तसेच बचत गटामार्फत तयार केले जाणाऱ्या वस्तू व पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी चांदाळा महिला बचत गटाच्या महिला शुभांगी दुगा, पूजा पदा, रूपा कुमरे, रोशनी शेरकी, वर्षा आतला, वनिता नैताम, अनिता किरांगे, ममता कीरंगे, पल्लवी किरंगे, सुनीता गावडे, पुष्पा कोवे, शालीना उसेंडी, अनिता कोवे, उषा गावडे, इंदू कोवे, अलका नरोटे, प्रांजली कुमरे, नतिषा कोवे, सलोनी कीरंगे, तेजस्विनी पदा, शीला कोवे, माधुरी कीरंगे , माया कीरंगे, इत्यादी महिला उपस्थित होत्या.
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सतीश पवार सचिव किशोर चिलमवार कोषाध्यक्ष नितीन चेंबूलवार , ज्येष्ठ सदस्य नादिर भामाणी, परवीन भामानी, सुरेश लडके, शेमदेव चाफले, शेषराव येलेकर, भुजंग हिरे, दादाजी चूधरी, तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी फंक्शन हाल गडचिरोली येथे लायन्स क्लबच्या सदस्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. क्लब मधील सर्व सदस्यांनी यात सहभागी होऊन वर्धापन दिन व क्लब चे अध्यक्ष सतीश पवार यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा केला कार्यक्रमाची सांगता सहभोजनाने झाली.
प्रा शेषराव येलेकर
सह संपादक पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क