गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

महाज्योतीच्या एमएच सेट परीक्षा प्रशिक्षण योजनेचे यश 92 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

Summary

गडचिरोली,(जिमाका) दि.18:महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपूर व सीआरजी अकादमी फॉर सस्केस पुणे या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. लक्षीत प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राध्यापक, सहायक प्राध्यापक […]

गडचिरोली,(जिमाका) दि.18:महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपूर व सीआरजी अकादमी फॉर सस्केस पुणे या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. लक्षीत प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाची संधी मिळावी या उद्देशाने युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली. याकरीता दि. 15/9/2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. प्रशिक्षणास इच्छुक नॉनक्रिमीलेअर उत्पन्न गटातील उमेदवारांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले.
प्रशिक्षणासाठी एकूण 1556 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या 1207 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. 1127 विद्यार्थ्यांना ऑफलाईन तर 80 विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. यातील 92 विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
एमएच सेट परीक्षा प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आवश्यक व अकस्मिक गरजेकरीता सहा महिने विद्यावेतन देण्यात आले.  मोफत प्रशिक्षणात निवडण्यात आलेल्या विषयाचे वर्ग, विषयवार चर्चा, प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांमधे प्रियंका ठाकरे, परमेश्वर दास, वैभव कापसे, भुपेंद्र ढाले, महेश भांडे, भावीका शिंदे, अश्विनी वडे, उमेश पालवे, रिना चव्हाण, खुशवंत नांथे, विशाल आदमने, अपेक्षा गावंडे, विष्णू गोरे, मनिषा तोरकडे, विकास पिसे या व इतर विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

अतुल सावे मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, सरकार तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
राजेश खवले व्यवस्थापकीय संचालक महाज्योती, नागपूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
_________________________

एमएच सेट उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोगत

1)   माहाज्योतीमुळे आई-वडीलांचे शिकून मोठा होण्याचे स्वप्न साकार झाले.
वृत्तपत्राच्या माध्यमातून महाज्योतीच्या युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. सुचनेनुसार अर्ज करुन प्रशिक्षणास पुणे येथे पाठवण्यात आले. सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत महाज्योतीकडून विद्यावेतन देण्यात आले. विद्यावेतनाने पुण्यात राहण्या, खाण्याची, शिक्षणाची, शैक्षणिक साहित्याची सोय करता आली. याआधारे सेट परीक्षा पास करता आली. आज मी कॉमर्स कॉलेजला सहाय्यक प्राध्यापक म्हणून कामाला लागलो. आई-वडीलांचे शिकून मोठा होण्याचे स्वप्न साकार झाले. आम्हा साऱ्यांचे स्वप्न महाज्योतीमुळे संपुर्ण झाले.
– वैजनाथ भारत इडोळे, आडोळी, वाशीम
________________________________

2)   महाज्योती गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून शैक्षणीक, आर्थिक मदत करत आहे.
मी रसायनशास्त्र हा विषय घेऊन सेट पास झालेले आहे. सेट मधे दोन विषय असतात एक कॉमन असतो आणि दुसरा निवडायचा असतो. कॉलेजमधील शिक्षकांकडून महाज्योतीच्या युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. मार्गदर्शन मिळाले. पुण्यातील प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यावेतन मिळाले. त्याने पुण्यात राहण्या, खाण्याची, अभ्यासाची सोय झाली. माझ्यासह माझ्यासारखे बरेच विद्यार्थी होते जे महाज्योतीच्या या योजनेचा लाभ घेत होते. आणि ते सारेच खुप सामान्य घरातून आलेले होते. महाज्योती गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्याला शैक्षणिक, आर्थिक मदत करत आहे. घडवित आहे.
प्रणीता जावळे, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *