मुख्यमंत्र्यांनी बोलाविली ओबीसी नेत्यांची बैठक
Summary
7 डीसेंबर 2020च्या मुंबईच्या अधिवेशनावरील महामोर्चाची दखल घेवुन ओबीसी लढ्यातील महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना मा. मुख्यमंत्र्यांनी पाचारण करून जम्बो बैठकीचे 20 नोव्हेंबर ला आयोजन विदर्भातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक मा. डॉ. अशोक जिवतोडे उपस्थित […]
7 डीसेंबर 2020च्या मुंबईच्या अधिवेशनावरील महामोर्चाची दखल घेवुन ओबीसी लढ्यातील महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना मा. मुख्यमंत्र्यांनी पाचारण करून जम्बो बैठकीचे 20 नोव्हेंबर ला आयोजन
विदर्भातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक मा. डॉ. अशोक जिवतोडे उपस्थित राहणार
दि. 7 डीसेंबर 2020 ला मुंबई येथील हीवाळी अधिवेशनावर धडकणा-या ओबीसी समाजाच्या मोर्चाची तातडीने दखल घेवुन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. उध्दवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना आमंत्रित केले आहे. या बैठकीत राज्याचे ईतर मागास बहुजण कल्याण मंत्री मा. श्री. विजय वडेट्टीवार व इतर ओबीसी मंत्री उपस्थित राहणार आहेत.
सदर बैठकीला राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, मुंबई व ठाणे, विदर्भ आदी विभागातील मुख्य ओबीसी नेत्यांना उद्या (दि.20) रोज शुक्रवारला मुंबई येथे बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ही बैठक दुपारी 2 ते 5 च्या दरम्यान होत असुन सदर बैठकीत 7 डीसेंबर ला होणा-या ओबीसी समाजाच्या विशाल मोर्चाच्या पार्श्वभुमीवर ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात चर्चा होणार आहे. व ओबीसींच्या अनेक मागण्यांना वाचा फुटनार आहे.
या बैठकीला विदर्भातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक मा. डॉ. अशोक जिवतोडे उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्रीद्वारा ओबीसी चळवळीतील नेत्यांना दूस-यांदा बोलावून ओबीसी आंदोलनाची दखल घेण्याची ही आजपर्यंत च्या शासनातील पहिलीच वेळ आहे. या अगोदर 11 ऑक्टोबर 20 लाओबीसी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आहे.
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा शेषराव येलेकर