भंडारा महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांच्या मध्यस्थीने मोहाडी -खरबी मार्गावर अनर्थ टळला

Summary

तुमसर-भंडारा राज्यमार्गावरील मोहाडी-खरबी शिवारात ११ केव्ही उच्च दाबाच्या जिवंत विद्युत तारावर वृक्ष पडल्याने सदर जीवंत विद्युत तारा खरबी -मोहाडी मार्गाच्या मधोमध पडल्या होत्या.दरम्यान आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे तुमसर जनसंपर्क कार्यालयातुन वरठी येथे जात असतांना खरबी शिवारात गणेश राईस जवळ त्यांनां […]

तुमसर-भंडारा राज्यमार्गावरील मोहाडी-खरबी शिवारात ११ केव्ही उच्च दाबाच्या जिवंत विद्युत तारावर वृक्ष पडल्याने सदर जीवंत विद्युत तारा खरबी -मोहाडी मार्गाच्या मधोमध पडल्या होत्या.दरम्यान आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे तुमसर जनसंपर्क कार्यालयातुन वरठी येथे जात असतांना खरबी शिवारात गणेश राईस जवळ त्यांनां उच्च दाबाच्या जिवंत विद्युत तारा लोंबकळत दिसल्या त्यावेळी आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी वेळीच पुढाकार घेत मार्गावरून जाणाऱ्या -येणाऱ्या वाहनांना था़ंबवुन जिवंत विद्युत तारा स्पर्शा पासुन वाहनचालकांना बचावले. व खरबी येथिल कंत्राटी विद्युत सहाय्यक विनायक सिंदपुरे, यांना घटनास्थळी पाचारण करुन सदर विद्युत पुरवठा बंद करून लोंबकळणाऱ्या तारा महामार्गावरून बाजुला करण्यात आल्या व वाहतुक पुर्वरत सुरु करण्यात आली त्यावेळी पत्रकार सुधिर गोमासे,रोहीत बोबार्डे, आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र, अंगरक्षक गुरु शेंडे, येणारे -जाणारे नागरीक, वाहनचालक उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *