BREAKING NEWS:
कृषि भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान जंगलालगत शेती धोक्याची शेतकरी झाले अतिदारिद्री

Summary

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क वृत्त संकलन भंडारा:-      जिल्ह्यात घनदाट जंगल असून काही तालुक्याला लागून अभयारण्य सुद्धा आहेत. घनदाट जंगलात हिंस्र प्राण्यांसह तृणभक्षी प्राण्यांची ही संख्या वाढत चाललेली आहे. परंतु जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांची शेती धोक्याची ठरत असून वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे […]

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क वृत्त संकलन भंडारा:-
     जिल्ह्यात घनदाट जंगल असून काही तालुक्याला लागून अभयारण्य सुद्धा आहेत. घनदाट जंगलात हिंस्र प्राण्यांसह तृणभक्षी प्राण्यांची ही संख्या वाढत चाललेली आहे. परंतु जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांची शेती धोक्याची ठरत असून वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आमदनी अठन्नी खर्चा रुपया अशी परिस्थिती जंगलालगत शेती असलेल्या शेतकऱ्याची झाली आहे.
    जिल्ह्यात पवनी तालुक्यात उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य असल्याने या अभयारण्यलगत खापरी, गायडोंगरी, कवडसी, पाहुणगाव तसेच चार रिठी गाव आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेती जंगलालगत असलेल्या अभयारण्यात लगतच आहेत. दरवर्षी शेतकरी महागडी बियाणे खरेदी करून पेरणी करतो. पिकावर रासायनिक खताचा डोज देतो. परंतु खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो पिकात येऊन हरिण, सांभर, निलगाय, रानगवे, रानडुकरांचे कळप व माकड सुद्धा येऊन पिकाची नासाडी करतात. त्यामुळे शेतकरी बियाण्यांची पेरणी करतात परंतु पिकाची कापणी करीत नाही. त्यामुळे जंगलालगत असणाऱ्या अभयारण्य लगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पादन होत नसल्याने अशा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली दिसत आहे. त्याचप्रमाणे कोका-अभयारण्य लगत भंडारा तालुक्यातील वाडीपार रीठी, सीतेपार मांडवी, इंजेवाडा, सरपेवाडा, मंडणगाव, दुधाळा, किटाळी, सालेहेटी, माटोरा, नवेगाव चंद्रपूर, कोका, या गावातील शेतकरीही दरवर्षीच रब्बी व खरीप हंगामात पिकाची पेरणी करतात, परंतु वन्यप्राणी शेतात शिरून पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकरी पुरता घायाळ झालेला आहे. अशाच प्रकारे तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात वन्य प्राण्यांच्या हैदोस सुरू आहे. त्यामुळे उपद्रवी वन्य प्राण्यांमुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

वन्यजीव संरक्षण कायदा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

शासनाच्या वतीने वन्यजीव संरक्षण कायदा करून वन्य प्राण्यांची सुरक्षा केली जाते. परंतु वन्यजीव संरक्षण कायदा शेतकऱ्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे. वन्यप्राणी शेतकऱ्यांसह शेतमजुरांवरही हल्ले करीत आहेत. पाळीव जनावरे फस्त करीत आहेत. शासनाकडून तुटपुंजी नुकसान भरपाई देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊनही शेतकरी हा नागावला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *