आरोग्य क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याच्या आरोप. साकोली उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती पश्चात महिलेचा मृत्यू. साकोली पोलीसात तक्रार दाखल कुटुंबियांचा आक्रोश.

Summary

प्रतिनिधी साकोली     शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण करणार ‘वनिता भिवगडे या महिलेचे २८ जुलै रोजी सकाळी सिजर करण्यात आले. दिनांक २९ जुलै रोजी पहाटे ०४:०० वाजता तिच्या पोटात दुखायला लागले. तिच्यावर डॉक्टरांनी औषधोपचार करून महिला रुग्णाला वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न […]

प्रतिनिधी साकोली
    शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण करणार ‘वनिता भिवगडे या महिलेचे २८ जुलै रोजी सकाळी सिजर करण्यात आले. दिनांक २९ जुलै रोजी पहाटे ०४:०० वाजता तिच्या पोटात दुखायला लागले. तिच्यावर डॉक्टरांनी औषधोपचार करून महिला रुग्णाला वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र सकाळी सहा वाजता वनिता भिवगडे या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. मृतक महिलेचे प्रेत उत्तरणीय तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच तिच्या मृत्यूचे कारण कळू शकेल. सध्यातरी महिला रुग्णाच्या मृत्यूचे कारण सांगता येत नाही : संदीप गजभिये, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय साकोली

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
       प्रसुतीसाठी दाखल महिलेचा प्रसुती पश्चात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिनांक २८ जुलै रोजी साकोली उपजिल्हा रुग्णालयात घडली. या घटनेमुळे मृतक महिलेच्या कुटुंबीयांनी उपजिल्हा रुग्णालयात आक्रोश व्यक्त केला सोबतच नागरिकांनी राडा केला. अनुचित घटना घडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळंतिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतक महिलेचे पती विजय भिवगडे यांनी साकोली पोलीसात केलेल्या तक्रारीत केला असून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे. वनिता विजय भिवगडे पंचवीस वर्षे राहणार मुंडीपार/सडक असे मृत बाळंतीणीचे नाव आहे.
          साकोली तालुक्यातील मुंडीपार/सडक येथील वनिता भिवगडे या महिलेला दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ०४:०० वाजता दरम्यान प्रसूती करिता उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे दाखल करण्यात आले. सदर महिलेचे सिजर करण्यात आले. गोंडस बाळ जन्माला आले. दिनांक २८ जुलै रोजी सकाळी १०:०० वाजता दरम्यान वनिता भिवगडे ही शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्यानंतर तिच्या पोटात दुखत असल्याचे तिच्या कुटुंबियांकडून सांगितले जात आहे. काही वेळातच वनिता हिची प्राण ज्योत मालवली. बाळंतीनीचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आला. माहिती होताच कुटुंबीयांसह नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी करून राडा केला. पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार राजेश थोरात यांनी अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी काही काळ रुग्णालयात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दिनांक २९ जुलै २०२३ रोजी सकाळी मृतक महिलेचे प्रेत उत्तरणीय तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पत्नीचा प्रसुती पश्चात मृत्यू झाला. असा आरोप पती विजय भिवगडे यांनी साकोली पोलिसात दिलेल्या तक्रारीतून केला असून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *