कत्तलखाण्या कडे जाणार्या गोवंशांना जीवनदान कोंढाळी पोलीस व गावकर्यांच्या सहकार्याने सात लाखांचा मुद्देमाल जप्त गोवंश पारडसिंगा येथील गो शाळेत

कोंढाळी -वार्ताहर दुर्गा प्रसाद पांडे
२८जुलै शुक्रवार चे रात्री ०३-३०चे दरम्यान नागपूर कडून अमरावती कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो पिक -अप व्हैन ला रात्र गस्तीवर असलेल्या कोंढाळी पोलीसांनी कोंढाळी येथील कोंढाळी वर्धा टी पांईट वर भरधाव वेगात येणारी बोलेरो पिक अप क्रमांक एम एच-३०-बी डी ५४९९ या वाहनाला थांबवून तपासणी केली असता यात ११मोठया गाई व एक कालवड (सर्व गोवंश) असे एकूण
१२गोवंशाना पिक अप मधे क्रूरतेने भरून कत्तलखान्याकडे अमरावतीकडे पिक मधून परिवहन करत असल्याचे दिसले रात्रगस्तीवर असलेल्या कोंढाळी पोलीसांनी वाहन तपासणी करते वेळी गोवंश घेऊन जानार्या वाहनांचे चालक व कंडक्टर वाहन सोडून पळत असतांना येथील गोरक्षक बबलू बिसेन त्यांचे सहकारी तसेच
गावकर्यांनी पोलीसांचे मदतीला धावून आले तेंव्हा पोलीसांनी वाहन चालकाला पोलिसांनी
वाहन चालकाला पकडले मात्र वाहनातील एक इसम फरार झाला. या प्रकरणी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ संदिप पखाले उपविभागीय पोलिस अधिकारी बापू साहेब-रोहोम , ठाणेदार पंकज वाघोडे यांचे मार्गदर्शनाखाली ए एस आय राजकुमार कोल्हे, पोलीस शिपाई ओम राठोड यांनी गोवंशाची क्रूरतेने वाहतूक करने याकरीता वाहन चालकाला अटक करून सहा लाखांचे पीक-अप तसेच एक लाखाचे पशुधन ला ताब्यात घेतले . तसेच गो रक्षक बबलू बिसेन व त्यांच्या सहकाऱ्यांनी १२गोवंशाना पारडसिंगा येथील गो शाळेत ठेवण्यात आले आहे.
*परिवहन (आर टी ओ)विभाचे दुर्लक्ष*
पशु तस्करी करनारे आपल्या वाहनांचे सामोरील वाहन क्रमांक सहजा सहजी दिसनार नाही अश्या प्रकारे बसविण्यात आले आहे, तर वाहनांचे मागचे बाजूला वाहन क्रमांकच लावण्यात आला नसल्याचे दिसून येते. खरे तर महामार्गावर वेगाने धावणाऱ्या व पशूतस्करीत गुंतलेली वाहनांच्या नियमबाह्यते कडे परिवहन (आरटीओ )चे दुर्लक्ष असल्याचे सांगितले जाते आहे.