कर्नाटक येथील CFTRI म्हैसूर या भारत सरकार च्या इन्स्टिट्यूट मधे नागपूर जिल्ह्यात भिवापुर तालुका मधील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र संस्थेचे उपकेंद्र नागपूर ३ दिवसीय मिरची आणि मसाले क्लस्टर भिवापूर मिर्ची व मसाले क्लस्टर चे 3 दिवसीय तांत्रीक प्रशिक्षण संपन्न …

पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क:-
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उप केंद्र हिंगणा रोड नागपूर तर्फे सीएफटीआरआय म्हैसूर कर्नाटकच्या तांत्रिक सहकार्याने १७ ते १९ जुलै २०२३ कालावधीत मिरची आणि मसाले क्लस्टर भिवापूर १५ सदस्यांसाठी GoM DI मुंबई व जिल्हा उद्योग केंद्र नागपूर द्वारा पुरस्कृत MSI-CDP योजनेमार्फत ३ दिवसीय मिरची आणि मसाले प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या प्रशिक्षणात क्लस्टर चे मुख्य समन्वयक श्री. नारायण लांबट श्री. सहारकर सावजी मसाले व इतर 15 उद्योजक नी यशस्वी तांत्रीक प्रशिक्षण पूर्ण केले या प्रशिक्षण व भेटीचे आयोजन एमसीईडी उपकेंद्र हिंगणा रोड नागपूर तर्फे करण्यात आले असून
या प्रशिक्षणाचे समन्वय श्री. हेमंत वाघमारे, केंद्र प्रमुख, उपकेंद्र महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर यांनी महत्वाची भूमिका बजावली.