BREAKING NEWS:
महाराष्ट्र

लायन्स क्लब गडचिरोली च्या वतीने धानोरा तालुक्यातील तोडे मसाज या अतिदुर्गम गावातील आदिवासी बांधवांना पूरग्रस्त किट चे वाटप.

Summary

लायन्स क्लब गडचिरोली चे वतीने  धानोरा तालुक्यातील अतीदुर्गम भागातील  तोडे मसाद या गावातील आदिवासी बांधवांना 10 पूरग्रस्त किट चे वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे लायन्स क्लबच्या वतीने अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी विविध उपक्रम राबवले जातात.यावर्षी अचानक आलेल्या पुरामुळे […]

लायन्स क्लब गडचिरोली चे वतीने  धानोरा तालुक्यातील अतीदुर्गम भागातील  तोडे मसाद या गावातील आदिवासी बांधवांना 10 पूरग्रस्त किट चे वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे लायन्स क्लबच्या वतीने अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी विविध उपक्रम राबवले जातात.यावर्षी अचानक आलेल्या पुरामुळे आदिवासी बांधवांचे बरेच नुकसान झाले.यानिमित्ताने छोटीशी मदत म्हणून लायन्स क्लब ने पाण्याची बादली,पाच ग्लास पाच वाट्या,एक गंज.पाच किलो तांदूळ अशी किट तयार करून त्या गरजूंना वाटप करण्याचा उपक्रम राबविला.. कार्यय्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे गाव पाटील चिन्नूजी तोफा,लॉ सतीश पवार, लॉ प्रा. देवानंद, कामडी, लॉ सुचिता कामडी, लॉ शिवानी येलेकर,लॉ. संजना येलेकर, विठ्ठलराव,
कोठारे, प्रशांत नैताम, विवेक मुन,उध्दव बांगरे,सुधाकर दुधाबावरे,सुनीता भोयर,येशुजी हलामी,मधुकर जाडे, आशिराम उसेंडी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. शेषराव येलेकर
गडचिरोली

One thought on “लायन्स क्लब गडचिरोली च्या वतीने धानोरा तालुक्यातील तोडे मसाज या अतिदुर्गम गावातील आदिवासी बांधवांना पूरग्रस्त किट चे वाटप.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *