कोंढाळी च्या अरस्तु रंगारी ने गाठले मंत्रालय जिद्द व चिकाटी समोर अशक्य काही च नाही इंदिरानगर झोपडपट्टीतील अरस्तु मुंबई मंत्रालयात
कोंढाळी – दुर्गा प्रसाद पांडे
काटोल तालुक्यातील ग्रामपंचात कोंढाळी अतंर्गत इंदिरानगर झोपडपट्टी मधील एका वाहन दुरुस्ती करनार्याच्या मुलाने कठीण प्रसंगाला तोंड देत अखेर मंत्रालय गाठले.
एका मजुराच्या मुलाने मिळेल तो रोजगार करत करत आपले शिक्षण सुरू ठेवले या दरम्यान बी फार्म झाल्यावर काही महिने औषधी प्रतिनिधी चे काम केले. यानंतर कुठल्याही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता मिळेल तो रोजगार करत करत अरस्तु बहादूर रंगारी यांनी एम पी एस सी ची परिक्षा उत्तीर्ण करत मंत्रालयात लिपीक म्हणून नियुक्ती मिळाली आहे.
येथील इंदिरा नगर झोपडपट्टी येथे राहणाऱ्या बालवयातच पित्याचे छत्र हरविल्या नंतर दोन बहिणी चा सांभाळ करत आई रंगारी यांनी झोपडपट्टी लगगच्या लाखोटीया भुतडा हायस्कूल द्वारा संचालित लोणकर राठी प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण व नंतर लाखोटीया भुतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी ची परिक्षा पास झाल्यावर विविध अभ्यासक्रम व प्रशिक्षणा साठी परिश्रम घेतले.यातच मोलमजुरी करून आईने दोन्ही बिहीनींचा सांभाळ करत मुला मुलींच्या शिक्षण व नंतर त्यांचे लग्न यातच मुलाचे शिक्षणासाठी लागणारी मदत अश्यातच आर्थिक विवंचनेतून मुलाच्या अभ्यास व शिक्षणा करिता लागनारा खर्चासाठी मोलमजुरी करत मुलाच्या शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन मिळत गेल्याने अगदी बालपणातच पितृछत्र गमावल्यानंतर आई व ताईं कडून सतत मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे तसेच आर्थिक विवंचनेची जान ठेवत जिद्द व चिकाटी चे भरवशावर प्रथम पोलिस उपनिरीक्षक पदाची परिक्षा पास केली मात्र आवश्यक लागणारी ऊंची कमी पडली, या नंतर ही आईकडून मिळाणारे प्रोत्साहन व स्पर्धा परीक्षा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळवत अखेर इंदिरानगर झोपडपट्टी च्या अरस्तु ने अखेर मंत्रालय गाठले.
अरस्तु रंगारी यांनी सांगितले की आई व
ताईं चे शिक्षणासाठी मिळालेले प्रोत्साहन तसेच जिद्द व चिकाटीने आर्थिक विवंचनेची तमा न बाळगता आपले ध्येय गाठता येते.P
