जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत.
Summary
नागपूर :- शाळेचा पहिला दिवस शाळेची घंटा वाजली जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळा नंदनवन येथे नवागतांचे ज्ञानमंदिरात प्रवेश ध्यारावर येताच स्वागत करण्यात आले. शिक्षकांनी आधीपासून विद्यार्थ्यांच्या आगमनाची पुर्वतयारी केली होती. प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांच्या फुलांचा वर्षाव व टिळक लावून स्वागत करण्यात आले. […]

नागपूर :- शाळेचा पहिला दिवस शाळेची घंटा वाजली जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळा नंदनवन येथे नवागतांचे ज्ञानमंदिरात प्रवेश ध्यारावर येताच स्वागत करण्यात आले. शिक्षकांनी आधीपासून विद्यार्थ्यांच्या आगमनाची पुर्वतयारी केली होती. प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांच्या फुलांचा वर्षाव व टिळक लावून स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर त्यांना खाऊ देण्यात आला. शालेय मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने गणवेश, कंपास पेटी, वही, पेन्सिल, व इतर साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षकांनी मेहनत घेऊन वर्ग जणू स्वर्गच बनवले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्याचबरोबर विविध शैक्षणिक क्षेत्रातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर गुरुकुलचे मुख्याध्यापक श्री. संजय निंबाळकर उपस्थित होते. शास्त्री शिक्षण संस्थेच्या सदस्या सौ. अंकिता मानकर शाळेचे पालक उपस्थित होते,प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यपक संजय निंबाळकर यांनी विद्यार्थांना शालेय अभ्यासाव्यतिरिक्त, इतरही खेळाला प्राध्यान देण्यासाठी मागदर्शन केले,कार्यक्रमाचे संचलन निता बोधे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशवीसाठी सहाययक शिक्षिका पौर्णिमा नलगे, अरुणा कुऱ्हाडकर, तुषार चापले, आकाश कोकोडे यांनी सहकार्य केले. व आभार पौर्णिमा भोसले यांनी मानले