नागपुर

काटोल तालूक्यात पहिल्याच पावसात शेतकऱ्यांची पेरणी ची लगबग

Summary

कोंढाळी : प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे काटोल तालुक्यात शनिवारी सायंकाळी पावसाने एंट्री केली. तालुक्यात सरासरी ११९‌.३३ मिमी पाऊस पडला असला तरी अद्याप पेरणीयोग्य पाऊस नाही. पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकरी आनंदी झाला आहे. यातच कृषी सेवा केंद्राच्या दुकानावर शेतकरी खत, बि- बियाणे खरेदीसाठी […]

कोंढाळी : प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे
काटोल तालुक्यात शनिवारी सायंकाळी पावसाने एंट्री केली. तालुक्यात सरासरी ११९‌.३३ मिमी पाऊस पडला असला तरी अद्याप पेरणीयोग्य पाऊस नाही. पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकरी आनंदी झाला आहे. यातच कृषी सेवा केंद्राच्या दुकानावर शेतकरी खत, बि- बियाणे खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काटोल तालुक्यात पहिल्यांदाच पडलेल्या पावसाची ११९.३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

पहिल्याच पावसात चांगली ओल झाल्याने पेरणीसाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकरी पेरणीसाठीची जुळवाजुळव करण्यात शेतकरी मग्न झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
दरम्यान गतवर्षीच्या जून महिना सुरु होताच जोरदार पाऊस पडला. त्यात सलग पाऊस पडल्याने मृग नक्षत्रात संपूर्ण पेरण्या झाल्या होत्या मात्र यंदा२३ जून पर्यंतचा महिना कोरडाच गेला. त्यात उन्हाचा पारा वाढल्याने दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली होती.अखेर शनिवारी सायंकाळी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजाकडून काही अंशी समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी पेरणीसाठी चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी पेरणी यंत्राच्या दुरुस्तीला व बि-बियाणे व खत गोळा करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.
काटोल तालुक्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६४ मिमी असून पहिल्याच पावसात काटोल महसुल मंडळात (१९५)मिमी, कोंढाळीमहसूल मंडळा मधे (३४)मि मी , मेटपांजरा महसूल मंडळात ३४मिमी, पारडसिंगा महसूल (८६) मिमी,रिधोरा महसूल मंडळ (११५) असा एकूण तालुक्यात सरासरी (११९.३३) मिमी एवढा पाऊस पडला आहे. अशी माहिती काटोल तहसीलदार राजू रणवीर यांनी दिली आहे. पेरणीसाठी आणखी पावसाची आवश्यकता असून पेरणी योग्य ओल झाल्यास शेतकर्यांनी परणी धरावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विक्रम भामरी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *