नागपुर

2023 चे देवर्षी पुरस्काराकरीता सुधीर बुटे यांची निवड व सन्मानित उमरेड येथे पुरस्कार सोहळ्याचे वितरण

Summary

कोंढाळी- -प्रतिनीधी-दुर्गाप्रसाद पांडे विदर्भ संवाद केंद्र ,विदर्भ प्रदेश रामटेकचे वतीने यावर्षीचा 2023 चा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुधीर बुटे यांना दि 24 जूनला सन्मानपूर्वक देण्यात आला. साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक भवन उमरेड येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले […]

कोंढाळी- -प्रतिनीधी-दुर्गाप्रसाद पांडे
विदर्भ संवाद केंद्र ,विदर्भ प्रदेश रामटेकचे वतीने यावर्षीचा 2023 चा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुधीर बुटे यांना दि 24 जूनला सन्मानपूर्वक देण्यात आला.
साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक भवन उमरेड येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सोहळ्याचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार डॉ. अनंत कोळमकर, मुख्य वक्ते तसेच ‘विदर्भ हुंकार’ मासिकाचे वृत्त संपादक राजेश जोशी ,आयोजक तथा
उमरेड जिल्हा प्रचार प्रमुख कुमार ताले,प्रचार प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार संजय तिवारी,अँड दाणी,सत्कार मूर्ती सुधीर बुटे अभय लांजेवार,भुपेश पाठरावे, काटोल तालुका पत्रकार संघ अध्यक्ष राजेन्द्र खामकर, पत्रकार रमेश गिरडकर,पत्रकार व ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येत उपस्थित होते.
——————/——/
———–^^^^^——-..
विदर्भ संवाद केंद्र रामटेक यांचे वतीने 2023 चे पुरस्कारा करिता नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार काटोल तालुका पत्रकार संघ माजी अध्यक्ष सुधीर चंपतराव बुटे रा कोंढाळी यांची निवड केली होती. त्यांना मान्यवरांचे हस्ते शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह व बुके देऊन सन्मानित करण्यात आले.बुटे यांना यापूर्वी पत्रकारितेत अनेक पुरस्कार मिळाले आहे.सोबतच क्रीडा , शिक्षण,सामाजिक,धार्मिक क्षेत्रात राज्य स्तरा पर्यत अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले आहे.

यावेळी मुद्रित पत्रकारितेत अभय लांजेवार उमरेड, इलेट्रॉनिक मीडिया भुपेश पाठरावे यांना सुद्धा देवर्षी पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविकातून ज्येष्ठ पत्रकार कुमार ताले ह्यांनी कार्यक्रमा मागील भूमिका मांडली. कार्यक्रमाचे संचालन अँड जयंत दाणी यांनी तर आभार अमित तोंडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *