कचारी सावंगा येथे दिव्यांगांना धनादेश वाटप
Summary
कोंढाळी -प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे काटोल तालुक्यातील कचारी सावंगा ग्रामपंचायतीत गावातील दिव्यांग बांधवांना धनादेश वाटप करण्यात आले. सरपंच रवी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. दरवर्षी दिव्यांगांसाठी ग्रामपंचायत निधी राखीव असतो. त्या निधीतून तब्बल 22 दिव्यांगांना धनादेश वाटप करण्यात […]
कोंढाळी -प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे
काटोल तालुक्यातील कचारी सावंगा ग्रामपंचायतीत गावातील दिव्यांग बांधवांना धनादेश वाटप करण्यात आले. सरपंच रवी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. दरवर्षी दिव्यांगांसाठी ग्रामपंचायत निधी राखीव असतो. त्या निधीतून तब्बल 22 दिव्यांगांना धनादेश वाटप करण्यात आला. तर काहींना घरपोच धनादेश देण्यात आला. या कार्यक्रमात सरपंच रवी जयस्वाल, सचिव प्रकाश लोलूसरे, ग्रामपंचायत सदस्य मनोज गणोरकर, वामन लोखंडे, सुधाकर गणोरकर, समाजसेवक गजानन मापले, अंबादास बडे यांच्यासह दिव्यांग महिला आणि पुरूष उपस्थित होते.