भटके विमुक्त जातीतील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या साकोली तालुक्यातील चारगाव येथील भटके विमुक्त जाती जमातीतील बहुरूपी समाजातील पियुष ईश्वर माहुले याने दहावीच्या परीक्षेत ७६% गुण घेतले तसेच अजिंक्य प्रल्हाद माहोरे याने ७५.२०% गुण घेतले. सर्वात महत्वाचे म्हणजे सडक अर्जुनी तालुक्यातील बिर्री या छोट्याश्या गावातील पायल अनिल तिवसकर या विद्यार्थिनीने ८०.६०% गुण घेऊन अख्या बहुरूपी समाजात प्रथम येण्याचा बहुमान पटकवलं.
शिक्षणापासून अलिप्त असलेल्या बहुरूपी समाजातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून समाजात एक आदर्श निर्माण केल,यांच्या यशामुळे बहुरूपी समाजाला शिक्षण घेण्याचा मार्ग मिळाला. तस पाहायला गेलं तर हा समाज शिक्षणापासून कोसो दूर आहे. पण या विद्यार्थ्यांच्या यशामुळे या बहुरूपी समाजातील लोकांना त्यांचेही मुलं शिकले पाहिजेत अशी तळमळ या समाजातील लोकांमध्ये निर्माण झाली आहे.