केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सामाजिक न्याय विभागाचा आढावा
मुंबई, दि.२६: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला.
सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सामाजिक न्याय विभागातील योजनेची यावेळी माहिती दिली. या बैठकीला झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे उप मुख्य अभियंता श्री.मिटकर, म्हाडाचे निवासी कार्यकारी अभियंता श्री. सानप, सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव सतीश खैरमोडे उपस्थित होते.
0000