भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी नखाते तर उपसभापतीपदी निंबार्ते
प्रतिनिधी भंडारा
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी पार पडली या निवडणुकीत काँग्रेस पॅनलचे नऊ तर भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाचे ९ संचालक निवडून आले. दिनांक २२ मे रोजी झालेल्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाचे विवेक नखाते यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी नामदेव निंबार्ते यांची निवड झाली. निवडणुकीनंतर नवनियुक्त सभापती व उपसभापती यांचे विजयाचे फटाके फोडून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक दिनांक २८ एप्रिल रोजी पार पडली. झालेल्या मतमोजणीत काँग्रेस पॅनलचे ९ तर भाजप राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाचे ९ असे संचालक निवडून आले. सभापती व उपसभापती पदाच्या निवडिकरिता दोन्ही पॅनल मध्ये रस्सीखेच दिसून आली. अखेरच्या क्षणी काँग्रेसचे संचालक विवेक नखाते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिनांक २२ मे २०२३ रोजी सभापती व उपसभापती पदाच्या निवडीकरिता सभा बोलविण्यात आली. या निवडणुकीत सभापती पदाकरिता भाजपात प्रवेश केलेल्या विवेक नखाते यांना उमेदवारी देण्यात आली. तर उपसभापती पदाकरिता नामदेव निंबार्ते यांनी अर्ज दाखल केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत विवेक नखाते हे १० मते मिळवून विजयी झाले. तर काँग्रेस पॅनल कडून रामलाल चौधरी यांना ८ मते मिळाली. उपसभापती पदाकरिता नामदेव निंबार्ते व नितीन कडव यांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये नामदेव यांना १० तर नितीन कडव यांना ८ मते मिळाली. नामदेव निंबार्ते उपसभापती पदी विराजमान झाले. उपस्थित कार्यकर्त्यांनी नवनियुक्त सभापती व उपसभापती यांचे फटाके फोडून व गुलाल उडवून आनंदोत्सव साजरा केला.