निवृत्तीचं वय 60 वर्षं करण्याला मुख्यमंत्र्यांची अनुकूलता 🔹 राजपत्रित अधिकारी महासंघाने दिली माहिती 🔹राजपात्रित अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिंदेंचा सकारात्मक प्रतिसाद
मुंबई : चक्रधर मेश्राम दिनांक – २१/५/२०२३ :-
निवृत्तीचे वय 60 वर्षं करण्याच्या मागणीवर सरकार विचार करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) याबद्दल अनुकूल आहेत . राजपत्रित अधिकारी महासंघाला मुख्यमंत्र्यांनी तसं आश्वासनही दिलंय. महासंघाची गुरुवारी मुख्यमंत्र्यां सोबत बैठक झाली. या बैठकीतच, निवृत्तीचं वय 60 वर्षं करण्याला मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली. राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी ही माहिती दिली.
सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे 60 करण्याबाबत अधिकारी महासंघाने बैठकीत भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अनुकुलता दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत भूषण गगराणी तर अधिकारी महासंघाच्या वतीने संस्थापक व. दि. कुलथे; अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर उपस्थित होते. या बैठकीत महसूल विभागीय संवर्ग वाटपाच्या अधिनियमातून पदोन्नत अधिकाऱ्यांना वगळणे, सेवानिवृत्ती उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे 20 लाख करणे, 80 वर्षे वयावरील वरिष्ठ सेवानिवृत्तांना केंद्राप्रमाणे निवृत्तीवेतन वाढ देणे आदी मागण्यांबाबत देखील सकारात्मक चर्चा झाली. चर्चा झालेल्या सर्व मागण्याबाबत शासन निर्णय प्राधान्याने व्हावेत, अशी आग्रही भूमिका महासंघाच्या वतीने बैठकीत स्पष्ट करण्यात आली.
