“अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस वीस वर्षे सश्रम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा”
प्रतिनिधी गोबरवाही
पोलीस ठाणे गोबरवाही अंतर्गत मौजा गुडरी, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा येथील राहणार आरोपी नामे राजेंद्र लक्ष्मीचंद धुर्वे वय २९ वर्षे राहणारा गुडरी यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने दिनांक १५-०५-२०२३ रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात भंडाराचे सत्र न्यायाधीश श्री. पी. बी. तिजारे सा. (स्पेशल जज पोक्सो) भंडारा यांनी आरोपीस वीस वर्षे सश्रम कारावास व ३०००/- रु. द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी दिनांक ०४-१०-२०२८ रोजी सायंकाळी ०७ वाजता पोलीस स्टेशनला येऊन तोंडी तक्रार दिली की फिर्यादीचे पती अंदाजे १५ वर्षांपूर्वी मरण पावले. फिर्यादी ही मजुरीचे काम करते. तिला दोन मुली आहेत फिर्यादीची अल्पवयीन मुलगी ही दहाव्या वर्गात शिक्षण घेत होती. ती नापास झाल्याने घरीच राहते. फिर्यादीचे घरी टीव्ही नसल्याने फिर्यादीच्या मुली ह्या म्हालपे भाऊ यांचे घरी टीव्ही पाहण्याकरिता जात होत्या. मार्च २०१८ मध्ये पीडीत्याची अचानक तब्येत खराब होऊन ती उलट्या करत होती. फिर्यादीने पिडीतेला विचारले असता आरोपी राजेंद्र लक्ष्मीचंद धुर्वे हा पिडिता त्याच्या मालपे भाऊ लागत असून त्याने पीडितेवर अत्याचार करून तिला लग्नाचे आमिष दिले. पीडितेच्या आईने आरोपीला याबाबत विचारणा केली असता तेव्हा त्याने तुमच्या मुलीशी लग्न करतो असे बोलला तेव्हा फिर्यादी त्या आशेवर होती मात्र दिनांक ३०-०९-२०१८ रोजी फिर्यादीच्या मुलीची तब्येत बिघडल्याने तिला भंडारा सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासून पीडित मुलगी ही आठ महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. आरोपी राजेंद्र धुर्वे याला पिडीतेशी लग्नाबाबत विचारणा केली असता उडवा उडवी ची उत्तरे दिल्याने आरोपीने तुमची मुलगी ही १८ वर्षाची पूर्ण न झाल्याने लग्न सुद्धा करू शकत नाही. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याने पीडितेच्या आईने पोलीस स्टेशन गोबरवाही येथे येऊन तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन गोबरवाई अपराधी क्रमांक १५२/१८ कलम ३७६(2) (एफ) (J) (3) भादवी सहकलम ४,६ बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री ओ.टी. गेडाम यांच्याकडे येताच त्यांनी सदर गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून गुन्ह्यातील आरोपी नामे राजेंद्र लक्ष्मीचंद धुर्वे वय २९ वर्षे, राहणारा गुडरी, तालुका तुमसर जिल्हा भंडारा याच तात्काळ कायदेशीर अटक करून गुन्ह्यात साक्ष पुरावा गोळा केला. गुन्ह्याचे तपासामध्ये सदर आरोपी विरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने आरोपीविरुद्ध कलम ३७६(2), (एफ) (J) (3) भांदवी सहकलम ४,६ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये या आरोपाखाली दोषारोप पत्र माननीय पोलीस विशेष न्यायालय भंडारा येथे दाखल केले. सदर आरोप पत्रास विशेष खटला क्रमांक ५०/१८ देऊन सुनावणी करिता ठेवण्यात आले सदर गुन्ह्याची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भंडाराचे सत्र न्यायाधीश श्री पीबी तिजारे सा. (स्पेशल जज पोक्सो) भंडारा यांचे न्यायालयात चालली गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता, श्रीमती दुर्गा तलमले, सत्र न्यायालय भंडारा यांनी योग्य बाजू मांडून साक्षीदार तपासले. दिनांक १५-०५-२०२३ रोजी पुराव्यांचे आधारे याला दोषी ठरवून कलम ६ सहकलम ५ (j) (२) (1) बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये २० वर्षे सश्रम करावास ३०००/- रुपये द्रव्यदंड व द्रव्यदंड न भरल्यास ३ महिने साधा करावासाची शिक्षा सुनावली आहे. व दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून अल्पवयीन पीडीतेला देण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक भंडारा श्री लोहित मतांनी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक तुमसर रश्मीता राव, पोलीस उपअधीक्षक गृह श्री विजय डोळस, सहायक पोलीस निरीक्षक श्री गोसावी ठाणेदार, पोलीस गोबरवाही यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार तिलक डी, बॅच नंबर १५४० यांनी योग्य पैरवी अधिकारी म्हणून कामकाज केले.