पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे उमेदवार श्री. सतीश काळे सर यांचा प्रचाराचा श्री गणेशा. —-
यवतमाळ:- वसंतराव नाईक विद्यालय चिखली भांडेगाव येथील सहाय्यक शिक्षक श्री सतीश माधवराव काळे यांना पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे आधीकृत उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. आज स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय धामणगाव रोड येथे आज प्रचाराचा श्री गणेशा करण्यात आला. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री वसंत नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. सी. राठोड सर, श्री गुरदे सर, श्री खोपे सर (निवृत्त शिक्षक अधिकारी )श्री. कोंबे सर , श्री गायकवाड सर, श्री. शेषराव राठोड, श्री. पप्पू पाटील भोयर सर, तसेच पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे उमेदवार श्री. सतीश माधवराव काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरवातीला भारतीय राज घटनेची शिल्पकार श्री बाबासाहेब आंबेडकर, हरित क्रांतीचे प्रणेते श्री. वसंतराव नाईक साहेब, वसंत नाईक शिक्षण संस्थेचे मानद सचिव श्री प्रताप सिंगजी आडे साहेब, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या मान्यवरांचे प्रतिमा पूजन करून झाली. या प्रसंगी मा. श्री. सतीश काळे यांनी माझी उमेदवारी ही शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या होणारी हानी, अनेक चुकीचे शासन निर्णय., जुनी पेंशन योजना, वेतनतर अनुदान. कार्यकर्ते यांची प्रभावी इच्छा, तसेच शिक्षक यांची प्रभावी भूमिका मांडण्यासाठी ही उमेदवारी असल्याचे प्रतिपादन केले. श्री. खोपे साहेब, श्री गायकवाड सर, श्री. गुरदे सर यांनी सुद्धा आपल्या भाषणात श्री. काळे सराना न. 1चा पसंती क्रम देऊन भरघोस मतांनी निवडून द्यावे असे विचार मांडले. उपस्थित लोकांनी सुद्धा काळे सरांचा सोबत राहून त्यांना विजयी करू असा संकल्प केला. या प्रसंगी वसंत नाईक शिक्षण संस्थेचे सर्व पदाधीकारी तसेच सर्व मुख्याध्यापक व शिक्षक आणी शिक्षकतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन श्री. धवने सर तर आभार प्रदर्शन श्री. प्रशांत जिंनेवार यांनी केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535