डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संमोहन स्टेज शो द्वारे समाजप्रबोधन
प्रतिनिधी बल्लारपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे महापुरुष जयंती उत्सव समिती च्या वतीने विविध बौद्धिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संमोहन तज्ञ डॉ जगदीश राठोड यांचे भव्य संमोहन स्टेज शो चे आयोजन करण्यात आले. या स्टेज शो च्या माध्यमातून समाजप्रबोधन, मनोरंजन, व वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करताना डॉ राठोड सरांनी संमोहित व्यक्तींकडून विविध प्रात्यक्षिके करून घेतली. या प्रात्यक्षिकांमध्ये जादू, मंत्र, भूत, भानामती, करणी, मूठ-मारणी हे सर्व थोतांड आहे असे सांगितले. तसेच स्पर्शभ्रम कसे होते, चविविषयीचे भ्रम, ध्वनीभ्रम, यांचे प्रात्यक्षिक दाखवीत असताना विद्यार्थ्यांना निंबाचा पाला खाल्ल्यानंतरही गोड वाटत होता आणि गाण्याचा आवाज नसताना सुद्धा नृत्य करून दाखवणं शक्य झालं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती विकासाबाबत प्रयोग करताना विद्यार्थ्यांना सांगितलेले डॉ. राठोड सरांचे फोन नंबर ९४०३११६६७७ संमोहनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर कार्यक्रमात विविध नकला, गायन, नृत्य, वाद्य, यांचा भरभरून आनंद घेतल्यानंतरही त्यांना फक्त झोप झालेली आहे असे वाटत होते आणि सर्वात शेवटी झोपेतून उठल्यानंतर अगदी फ्रेश वाटत होते, पण संमोहनाचा पूर्ण कार्यक्रम विसरले होते पण डॉ राठोड सरांनी माईंड प्रोग्रामिंग केलेला फोन नंबर विचारल्यावर ओरडुन मराठी व इंग्रजी मध्ये सांगू शकत होते. अश्याप्रकारे वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करून ताण, तणाव दूर करून भौतिक विकास करणारा कार्यक्रम डॉ. राठोड सरांनी सादर केला. या कार्यक्रमाचे आयोजक-संयोजक प्रशांत झामरे, अध्यक्ष लक्ष्मण गोरघाटे, महासचिव सुमित आमटे, कोषाध्यक्ष देशपाल सौदागर, कार्याध्यक्ष सचिन मेश्राम, कार्यक्रमाचे संयोजक राजेश ब्राह्मणे तसेच महिला कार्यकरणीचे अध्यक्षा रमाबाई गायकवाड, उपाध्यक्षा वीणाताई घुसे, महासचिव सुकेशिनी निमसत्कर, सचिव रसिकाताई जिवणे, कार्याध्यक्षा सुमनताई कळसकर व इतर पदाधिकारी भीम-मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी बल्लारर्शाहा शहरातील भव्य प्रेक्षक मंडळींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.