क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

भंडारा पोलिसांनी जुगार व दारू अड्ड्यांवर अकरा ठिकाणी धाड घालून एकूण 87,550/- रुपये किमतीचा माल केला जप्त

Summary

जिल्हा प्रतिनिधी/भंडारा 1) पोलीस स्टेशन कारधा कायमी अपराधी क्रमांक 158/2023 कलम 12 (अ) मजुका सह कलम 109 भादंवी आरोपी – आरोपी नामे 1) विश्वनाथ गजानन बावणे वय 42 वर्ष राहणारा चांदणी चौक, भंडारा, तालुका जिल्हा भंडारा 2) लालचंद बावणे वय […]

जिल्हा प्रतिनिधी/भंडारा

1) पोलीस स्टेशन कारधा

कायमी अपराधी क्रमांक 158/2023 कलम 12 (अ) मजुका सह कलम 109 भादंवी
आरोपी – आरोपी नामे 1) विश्वनाथ गजानन बावणे वय 42 वर्ष राहणारा चांदणी चौक, भंडारा, तालुका जिल्हा भंडारा 2) लालचंद बावणे वय 50 वर्ष राहणारा भंडारा
प्रकरण असे की यातील घटना तारीख वेळी व ठिकाणी प्राप्त मूखबिरचे खबरे वरून रेड केली असता नमूद आरोपी क्रमांक 01 हा सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन सट्टापट्टी कागदावर व वरली मटक्याचे आकडे लिहून कल्याण अ. क्र. 890/26 ते 35, 53, 83, 38 – 3000, 35, 56, 2000 असे आकडे लिहिलेली किंमत 00/- रुपये 2) एक दाट पेन किंमत 05/- रुपये 3) नगदी 1,990/- 4) एक जुना वापरता सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत 10,000 रुपये असा एकूण 11,995 रुपये मुद्देमाल मिळून आला तसेच सदर आरोपीस विचारपूस केली असता त्याने आरोपी क्रमांक 02 याचे करिता रोजीने सट्टापट्टी घेत असल्याचे सांगितल्याने फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरून नमूद आरोपीता विरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

2) पोलिस स्टेशन गोबरवाही
कायमी अप. क्र. 127/2023 कलम 12 (अ) म.जू.का.
आरोपी नामे – सिकंदर अमीर खां पठाण वय 50 वर्षे रा. गोबारवाही, ता. तुमसर, जिल्हा भंडारा
मिळालेला माल
1) एका पांढऱ्या लायनिंग असलेल्या कोऱ्या कागदावर निळ्या शाईने राजधानी नाईट मटक्याचे आकडे लिहिलेली सट्टापट्टी किंमत 00/- पैसे
2) एक निळ्या शाईचा डॉट पेन किंमत 05/- रुपये
3) अंगझडतीत पँटच्या खिशात नगदी 750/- रुपये असा एकूण 725/- रुपये

हकीकत
प्रकरण अश्या प्रकारे आहे की, वर नमूद घटना ता. वेळी व ठिकाणी यातील वर नमूद आरोपी हा सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन राजधानी नाइट मटक्याचे आकडे लिहून हार जितचा जुगार खेळ खेळीत असताना मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून 1) एका पांढऱ्या लाईनिंग असलेल्या कोऱ्या कागदावर निळ्या शाईने राजधानी नाइट मटक्याचे आकडे लिहिलेली सट्टा पट्टी कि. 00/- पैसे 2) एक निळ्या शाईचा दाट पेन किं. 05/- रू. 3) अंगझडतित पँटच्या खिशात नगदी 720/- रू असा एकूण 725/- रू माल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध वर नमूद कलमान्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला

3) पोलिस स्टेशन साकोली
अप क्रमांक 183/2023 कलम 12 (अ) मजूका.
आरोपी तारकेश्वर विठ्ठ्टलराव खरवडे वय 32 वर्षे रा. पंचशील वॉर्ड, साकोली.
मिळालेला माल – एका पांधऱ्या कागदावर निळ्या दाट पेनाने आकडे लिहिलेला सट्टापट्टी कागद. एक निळ्या शाईचा दाट पेन किंमत 5/- रू व अंगझडतीत मिळून आलेले नकदी 545/- रु. असा 550/- रु चा माल

4) पोलिस स्टेशन तुमसर
1) कायमी अपराधी क्रमांक 215/2023 कलम 65 (फ) म.दा.का.
आरोपी – लक्ष्मण हरी कुंभले वय 39 वर्षे रा. मेहगाव ता. तुमसर, जि. भंडारा
मिळालेला माल – 1) 40 प्लास्टिक पिशव्यात एकूण 800 किलो सडवा मोहाफास किंमत 56000/- रु. 2) दोन जर्मनी करच्या किंमत 1000/- रु. असा एकूण 61,400/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
2) कायमी अपराधी क्रमांक 216/2023 कलम 65(ई) म.दा.का.
आरोपी – गुलाब फोगल कुंभलकर वय 34 वर्षे रा. पिपरा, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा
मिळालेला माल – एका पोत्यामध्ये रबरी ट्यूब मध्ये अंदाजे 40 लिटर मोहफुलाची हाथ भट्टी दारू अंदाजे किंमत 4000 रुपये ची जप्त करण्यात आली.

5) पोलिस स्टेशन गोबरवाही
कायमी अप. क्रमांक 126/2023 कलम 65(ई) म.दा.का.
आरोपी – विश्वदास फकिरा परतेती वय 58 वर्षे रा. लोभी .
मिळालेला माल – तीन प्लास्टिक डबकिमध्ये अंदाजे 15 लिटर हाथभट्टी दारू किंमती 1500/- रु. चा माल.
प्रकरण असे की नमूद घटना तारीख वेळी व ठिकाणी गावातील महिला मंडळ चे खबरेवरून पंचासमक्ष नमूद आरोपीचे दारू विक्रीचे ठिकाणी रेड केला असता झडतीत त्याचे शेताजवळ जंगल शिवारात बांसाचे रांझे तीन प्लास्टिक डबकिमध्ये अंदाजे 15 लिटर हाथ भट्टी दारू किमती 1500/- रु. चा माल अवैधरित्या मिळून आल्याने आरोपीचे विरुद्ध फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

6) पोलिस स्टेशन साकोली
1) अपराधी क्रमांक 181/2023 कलम 65 (ई) म.दा.का. आरोपी – सौ. दीक्षा रोशन बडोले वय 33 वर्ष राहणारी वडद, तालुका साकोली, जिल्हा भंडारा, मिळालेला माल – एका पिवळ्या लाल रंगाचे थैल्यात 08 नग टायगर ब्रँड देशी दारू संत्री प्रत्येकी 180 मिली ने भरलेले काचेचे चापट पव्वे प्रत्येकी 70/- रु किमतीचे अशी 56/- चा माल जप्त करण्यात आला.
2) अपराधी क्रमांक 182/2023 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी – सौ. माधुरी जीवन खेडकर वय 31 वर्षे राहणारी वॉर्ड क्र. 5 सानगडी तालुका साकोली, जिल्हा भंडारा.
मिळालेला माल – एका हिरव्या रंगाच्या डबकिमध्ये 5 लिटर मोहफुलाचे हाथ भट्टी दारू किमती 500/- रु चा माल जप्त करण्यात आला.

7) पोलिस स्टेशन लाखनी
कायमी अपराधी क्रमांक 125/2023 कलम 65 (फ) म.दा.का.
आरोपी – फरार आरोपी नामे अश्विन मारुती डोंगरे, वय 27 वर्षे, राहणारा दैत, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा, मिळून आलेला माल – 1) जर्मनी घमेला किंमत 100/- रुपये 2) एक जुना वापरता छिद्र असलेला लोखंडी ड्रम किंमत 50/- रुपये 3) मोहाफास चढवा अंदाजे 30/- रुपये किलो किमती 2400/- रुपये, 4) लाकडी चाटू व कापडी पट्टा किंमत 00/- रुपये, 5) जलावू काड्या अंदाजे दहा मन किंमत 500/- रु. असे एकूण 3050/- रु. चा माल मिळून आल्याने जप्त करण्यात आला.

8) पोलिस स्टेशन पालंदुर –
अपराधी क्रमांक 43/2023 कलम 65 म.दा.का.
आरोपी – खुशाल शामराव निमजे वय 36 वर्षे राहणारा तई/बुज तालुका लाखांदूर किंमत माल – 7 नग देशी दारूचे 180 एम.एल.नि. भरलेले टिल्लू प्रत्येकी किमती 70/- रुपये एकूण 490/- रु. चा मुद्देमाल पोलीस स्टेशन कारधा गोबरवाही व साकोली येथे जुगारावर धाड घालून तीन गुन्हे दाखल करून किमती 13270/- रुपये तसेच तुमसर सिहोरा गोबरवाही साकोली लाखनी व पालांदूर येथे 60 लिटर हातभट्टी दारू किमती 6000/- रुपये 830 किलो सडवा मोहापास व साहित्य किमती 64,450/- रुपये 2 लिटर 700 एमएल देशी दारू किमती 1050/- तसेच 3 लिटर 240 एमएल विदेशी दारू किमती 2780- रुपये असा एकूण 74,280/- रुपयाचा असा एकूण 87,550 रुपयाचा माल जप्त करण्यात आला सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री रोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, यांच्या मार्गदर्शनात कारधा गोबरवाही व साकोली तसेच तुमसर सिहोरा गोबरवाही, साकोली, लाखनी व पालांदूर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *