महापुरुषांच्या सामाजिक समतेचा विचार अंगिकारावा – बबन गायकवाड

कोराडी – नांदा येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात आला.
त्यावेळी अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा कोराडी च्या वतिने चमत्कार सादरीकरण व प्रबोधन करण्यात आले.
महाराष्ट्र अंनिस नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे यांनी चमत्कार सादरीकरण करून चमत्काराच्या मागचे कार्यकारणभाव उपस्थितांना समजावून सांगितले.
तर शाखा कार्याध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी समितीची भुमिका व कार्य याबाबत प्रबोधन करताना महापुरुषांच्या सामाजिक समतेचा विचार सर्वांनीच अंगिकारावा असे मत महापुरुषांचे अनेक दाखले देत व्यक्त केले.
कार्यक्रमाला कोराडी शाखेचे अध्यक्ष ताराचंद पखिड्डे, महाराष्ट्र अंनिस चे कार्यकर्ते नांदा शाखा अध्यक्ष रुपरावजी घोडमारे, विलास झोडापे, सतीश झोडापे, उपसरपंच बोधिसत्व झोडापे, रवी खाडे, मनीषा खाडे, रमेश रासेकर, भारत जोडपे, मोरेश्वर खाडे, आनंद झोडापे, विनोद झोडापे, महादेव सोनटक्के, हेमंत मुसळे, विजय रासेकर, जानराव खाडे, चक्रधर हाडे खाडे, चौरे साहेब तसेच मंचकावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महिला, पुरूष व विद्यार्थीनींनी उत्तम प्रतिसाद दिला.
_________________________
आपला स्नेहांकित
गौरव आळणे
जिल्हा कार्याध्यक्ष
महाराष्ट्र अंनिस, नागपूर
मो. 8600145219
gauravalne609@gmail.com