लायन्स क्लब गडचिरोली प्रथम पुरस्काराने सन्मानित
नुकतीच लायन्स क्लब इंटरनॅशनल, डिस्ट्रिक्ट 32 34 H- 1 ची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स चोखरदाणी अमरावती रोड नागपूर येथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रवणकुमार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या कॉन्फरन्स मध्ये विदर्भाच्या ९ जिल्ह्यातील 105 क्लब मधील ८०० सदस्यांनी सहभाग नोंदवला होता. या कॉन्फरन्स मध्ये बॅनर्स सादरीकरण या उपक्रमात लायन्स क्लब गडचिरोली ला मान्यवरांच्या हस्ते प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बॅनर्स सादरीकरण या उपक्रमात लायन्स क्लब गडचिरोलीला पर्यावरण या विषयावर सादरीकरण करण्याची सूचना देण्यात आली होती. क्लबच्या अध्यक्ष डॉ सविता सादमवार, सचिव महेश बोरेवार ,कोषाध्यक्ष ममता कुकुडपवार यांचे नेतृत्वात क्लबने ” वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” या तुकाराम महाराजांच्या अभंगावर आकर्षक झाकी तयार करून या झाकीच्या माध्यमातून झाडे लावा, झाडे जगवा ! पाणी अडवा , पाणी जिरवा ! हा संदेश माहिती फलकाद्वारे व वारकरी भजनाच्या माध्यमातून उपस्थितांना देण्यात आला. झाकीमध्ये लॉ बाळासाहेब पद्मावार व छायाताई पद्मावार यांनी विठ्ठल – रुक्मिणीची तर प्रा. शेषराव येलेकर यांनी जगतगुरु संत तुकाराम महाराजांची मनोवेधक व आकर्षक अशी वेशभूषा परिधान केली होती तर वारकऱ्यांच्या भूमिकेत सतीश पवार, शांतीलाल सेता, प्रभू सादमवार, गिरीश कुकुडपवार, दीपक मोरे, नितिन चेंबूलवार , प्रा.संध्या येलेकर, मंजुषा मोरे, शालिनी निंबार्ते, स्वाती पवार, संजना येलेकर, गार्गी मोरे, अनुश्री मोरे, जानवी पवार यांनी सहभाग नोंदवला होता. संपूर्ण कॉन्फरन्स मध्ये ही झाकी उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. सर्वांनी मनभरून लायन्स क्लब गडचिरोली च्या अध्यक्ष डॉ सविता सादमवार व त्यांच्या संपूर्ण टीमचे मन भरून कौतुक केले.

