आर.आर. (आबा)पाटील सुंदर गांव पुरस्कार योजनेत धुरखेडा अव्वल

काटोल विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायतींनी प्रभावी अंमलबजावणी करावी. मागील निवड झालेल्या तालुका व जिल्हा स्मार्ट ग्राम ग्रामपंचायतींनी आपले सातत्य टिकवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावे
अनिल देशमुख
आर.आर. पाटील सुंदर गांव पुरस्कार योजना
काटोल पंचायत समिती मधून धुरखेडा ग्रा पं ला प्रथम पुरस्कार
कोंढाळी-प्रतिनीधी
नागपूर जिल्ह्या परिषदेच्या काटोल पंचायत समिती अंतरगत ग्राम पंचायत धुरखेडा सर्व भागातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती, विचारात घेऊन पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेच्या निकषात व स्वरुपात करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीस योजनेत सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध करण्यात आली होती.यात पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेचे रुपांतर करुन स्मार्ट ग्राम योजना सुरुवात करण्यात आली आहे. यात
नागपूर जिल्ह्यातील शंभरटक्के ग्रामपंचायतींनी जिल्हा व तालुका स्तरावर या योजनेत हिरीरीने भाग घेऊन योजनेची यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या अभियानाअंतरंगत तालुका व जिल्हा स्मार्ट ग्राम ग्रामपंचायतींनी आपले सातत्य टिकवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले होते. या योजनेची स्पर्धात्मक सुरुवात 2016-17 या आर्थिक वर्षापासून करण्यात येऊन राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार, शासनाच्या विविध योजनेची अंमलबजावणी करुन स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण आणि पारदर्शकता व तंत्रज्ञान यांचा वापर अशा बाबींवर गुणांकनाच्या आधारे सुंदर गाव ग्रामपंचायतीची निवड करुन जिल्हास्तर व तालुकास्तर असे पुरस्कार देण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली.
या अभियानात काटोल तालुक्यात तालुका स्तरावर धुरखेडा ग्राम पंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल राज्याचे माजी गृह मंत्री व काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल देशमुख यांनी धुरखेडा ग्राम पंचायतीचे सरपंच विठ्ठलराव उके व सचीव कृणाल वानखेडे यांचा 28 मार्च लासत्कार करण्यात आला. या प्रसंगी आमदार अनिल देशमुख यांनी सांगितले की
ग्रामविकास विभागाच्या 20 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. यात धुरखेडा ग्रा पं ने तालुका स्तरावर प्रथम स्थान पटकावले या करिता धुरखेडा ग्रामवासी व विषत: सरपंच विठ्ठलराव उके व ग्रा प च त्यांचे सर्व सदस्य व ग्रा पं सचीव अभिनंदनास पात्र आहेत.
अन्य ग्रा पंचायतीच्या पदाधिकारी व अधिकारी यांनी ही आप आपले गावांचा तालुका, जिल्हा व राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या प्रसंगी काटोल पंचायत समिती चे सभापती संजय डांगोरे, उपसभापती निशिकांत नागमोते, माजी उपसभापती अनुराधा खराडे, उप विभागीय अधिकारी श्रीकांत उंबंरकर, बी डी ओ संजय पाटील तसेच जि प व् पंचायत समिती चेआजि माजी पदाधिकारी व सदस्य तसेच, ग्राम विकास,पर्यावरण, कृषी,पेयजल, वीज, राजस्व, शिक्षण, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी तसेच सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचे उपस्थितीत धुरखेडा सरपंच व सजीवाचा सत्कार करून १०लाखाचा धनादेश ही वितरित करण्यात आला.