BREAKING NEWS:
महाराष्ट्र

यवतमाळ जिल्ह्यातील मौजा धामणी येथील अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचाराची राज्य महिला आयोगाकडून दखल. यवतमाळ पोलीस अधीक्षकांना मागितला अहवाल

Summary

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील धामणी येथे एका 40 वर्षीय नराधमाने चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात घडली. आरोपी पांडुरंग भडके या 40 वर्षीय नराधमाने घरी कुणी नाही हे बघून चिमुकलीवर अत्याचार केला या घटनेचा संपूर्ण विदर्भातून निषेध होत […]

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील धामणी येथे एका 40 वर्षीय नराधमाने चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात घडली. आरोपी पांडुरंग भडके या 40 वर्षीय नराधमाने घरी कुणी नाही हे बघून चिमुकलीवर अत्याचार केला या घटनेचा संपूर्ण विदर्भातून निषेध होत आहे.
राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून यवतमाळ पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात अहवाल मागितला आहे.
मारेगाव तालुक्यातील धामणी येथे एका 40 वर्षीय नराधमाने चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात घडली आरोपी पांडुरंग फडके या 40 वर्षीय नराधमाने घरी कुणी नाही हे बघून चिमुकलीवर अत्याचार केला यासंदर्भात श्री संत सखुबाई सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन महिला व बाल विकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांना निवेदन सादर केले, हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे मंत्रीमहोदयांनी तात्काळ कार्यवाही होण्यासाठी हे प्रकरण राज्य महिला आयोगाकडे पाठवले. सदर निवेदनात अत्याचार झालेल्या बालिकेला न्याय मिळविण्यासाठी १) शासनाच्या वतीने विशेष वकिलाची नेमणूक करावी,२) कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी ,३) सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्वरित न्याय मिळावा तसेच ४) न्याय मिळेपर्यंत आरोपीस जामीन मिळू नये अशा प्रकारच्या मागण्या केल्या आहेत.
सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे राज्य महिला आयोगाने तात्काळ दखल घेऊन सदर निवेदना बाबत आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करण्याचे निर्देश यवतमाळ पोलीस अधीक्षकांना दिले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा 1993 कलम 12( 2) व 12 (3) नुसार सदर प्रकरणाबाबत सादर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्वरित महिला आयोगाकडे पाठवण्यात यावा असे निर्देश सुद्धा राज्य महिला आयोगाने पोलिस अधीक्षक यवतमाळ यांना दिले आहे.

गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *