खाजगी बसेस ला पूर्ण आसान क्षमतेने 100% प्रवासी वाहतूक करण्यात यावी या करिता मा. श्री अनिलजी परब परिवहन मंत्री म. रा. यांना निवेदन
जिल्हा नागपुर वार्ता:- खाजगी बसेस च्या मालकांच्या विनंती वरुन श्री किशोर कुमेरीया माजी उपमहापौर, शिवसेना गटनेता, मनपा नगरसेवक, यांच्या नेतृत्वात प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री दिनकर भालेराव साहेब यांच्या सोबत खालील विषयांवर चर्चा करण्यात आल्या.
१) खाजगी बसेस मध्ये पूर्ण आसान क्षमतेने 100% प्रवासी वाहतूक करण्यात यावे.
२) खाजगी बसेस च्या मालकांच्या मागणी नुसार नागपुर जिल्हा (विभाग/Region) अशे परमीट लागू करावे.
३) राज्य शाषनाकडून खाजगी बसेस ला 50% करमाफी (टैक्स) दिल्यानंतरही RTO कार्यालयात येणाऱ्या अडचणीचा तोड़गा काढावा.
यावेळी मोहन बेलसरे, सागर चरडे, नथुजी दारोडे, नीलेश पुड़के, सचिन चिकटे, दिनेश महाजन, अमित शहाणे, नरेन्द्र हजारे, समीर सालुंके, संजय माहूर्ले, प्रफुल गमे, शैलेन्द्र जवादे आदि उपस्थित होते.