नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

नागपूर विभागाचे शिक्षक मतदार संघ विधान परिषदेचे आमदार मा.सुधाकर अडबाले साहेब यांनी दि 17/03/2023 ला स.10.30 वा. विधान परिषद मध्ये CSTPS चंद्रपूर मधील एम/एस.विजय इंटरप्रायजेस चे इचार्ज मुरारी समुद्धिवार यांच्या मार्फत महिला सफाई कामगार यांचावर जातीयवाचक शिवीगाळ दिल्याचे ( अट्रोसिटी ) प्रकरण विधान परिषद मध्ये मांडला

Summary

नागपूर विभागाचे शिक्षक मतदार संघ विधान परिषदेचे आमदार मा.सुधाकर अडबाले साहेब यांनी दि 17/03/2023 ला स.10.30 वा. विधान परिषद मध्ये CSTPS चंद्रपूर मधील एम/एस.विजय इंटरप्रायजेस चे इचार्ज मुरारी समुद्धिवार यांच्या मार्फत महिला सफाई कामगार यांचावर जातीयवाचक शिवीगाळ दिल्याचे ( अट्रोसिटी […]

नागपूर विभागाचे शिक्षक मतदार संघ विधान परिषदेचे आमदार मा.सुधाकर अडबाले साहेब यांनी दि 17/03/2023 ला स.10.30 वा. विधान परिषद मध्ये CSTPS चंद्रपूर मधील एम/एस.विजय इंटरप्रायजेस चे इचार्ज मुरारी समुद्धिवार यांच्या मार्फत महिला सफाई कामगार यांचावर जातीयवाचक शिवीगाळ दिल्याचे ( अट्रोसिटी ) प्रकरण विधान परिषद मध्ये मांडला बद्दल सहा महिला सफाई कामगार १) संगीता मेश्राम २) नमिता चव्हाण ३) तारकण गणवीर ४) मीना नैताम ५) कुसुम हत्तींमारे ६) इंदिरा कांबळे तर्फे तसेच रोजंदारी मजदूर सेना , CSTPS चंद्रपूर तर्फे आमदार मा.सुधाकर अडबाले साहेब यांचे मनपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏🙏 तसेच या प्रकरणमध्ये रोजंदारी मजदूर सेना संघटनेचे प्रमूख मार्गदर्शक मा.भाई सुभाषसिंग बावरे , केंद्रीय प्रभारी, रोजंदारी मजदूर सेना , मा.भाई सदानंद देवगडे, जिल्हाअध्यक्ष,रो.म.से.चंद्रपूर, मा.भाई विवेकानंद मेश्राम , शाखाध्यक्ष,रो.म.से.CSTPS, मा.भाई शैलेश बोरकर , प्रसिद्ध प्रमुख,रो.म.से.चंद्रपूर यांचा तर्फे मनपूर्वक आभार 🙏🙏🙏💐💐💐
सविस्तर वृत्त असे आहे की दि.05/02/2023रोजी
महिला सफाई कामगार १) संगीता मेश्राम २) नमिता चव्हाण ३) तारकण गणवीर ४) मीना नैताम ५) कुसुम हत्तींमारे ६) इंदिरा कांबळे सकाळी कामावर जात असताना साईट वरील एम/एस.विजय इंटरप्रायजेस चे साईट इचार्ज मुरारी समुद्धिवार यांना सहा महिला सफाई कामगार यांनी आम्ही कोणत्या कामावर जायचे असे विचारणा केली असता त्यांनी तुम्ही माझ्या कडे झोपण्याकरिता आले आहेत का? तुमची लायकी फक्त बाहेर धंदा करण्याकरिता आहे तुम्ही महार जातीच्या बाया फक्त आमच्या बेडवर झोपण्याकरिता आहेत.आज पासून तुम्ही सर्व बायांना कामावरून बंद करतो व ज्या बाईला काम पाहिजे ते बाई माझ्या किंवा काही सुपरवायझर सोबत झोपणार तेव्हा तुम्हाला मी कामावर घेणार नाही तर कामावर घेणार नाही तुम्ही महार बाया फक्त धंदा करण्याकरिता आहेत असे जातीयवाचक शिविगाळ केली आणि या सहा महिला कामगारांनी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याकरिता गेले असता त्यांना डावणाल्यांत आले व आरोपीच्या विरोध्यात अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत केस नोंदविण्यात आली नाही त्यानंतर त्यांना तीन दिवस टाळाताड करण्यात आली त्यानंतर सहा महिलांनी रोजंदारी मजदूर सेनेकडे तक्रार दिली असता रो.म.से.संघटनेचे केंद्रीय प्रभारी मा.भाई सुभाष सिंग बावरे , मा.भाई सदानंद देवगडे, जिल्हाअध्यक्ष,रो.म.से.चंद्रपूर, मा.भाई विवेकानंद मेश्राम , शाखाध्यक्ष,रो.म.से.CSTPS, मा.भाई शैलेश बोरकर , प्रसिद्ध प्रमुख,रो.म.से.चंद्रपूर यांनी लगेच पोलीस स्टेशन दुर्गापूर गाठून तक्रारी ची नोंद करून सहा महिला सफाई कामगारांचे बयान नोंद करून घ्याला लावले प्रकारांस गती यावी म्हणून चंद्रपूर चे DY, S.P यांना निवेदन देऊन या महिला कामगारांना तात्काळ न्याय देणाचे मागणी रोजंदारी मजदूर सेने तर्फे करण्यात आली.
✊✊✊ रोजंदारी मजदूर सेनेचा विजय असो ✊✊✊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *