महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) नागपूर येथे आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

अमर वासनिक/न्युज एडिटर
आज दिनांक ०८-०३-२०२३ रोजी उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व जागतिक महिला दिवस हा कार्यक्रम एम सी ई डी येथे उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमामध्ये उपस्थित प्राशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थींनी यांनी सुद्धा मंचावर येऊन आपापला सहभाग, कविता, भाषण सादर केले.
एम सी ई डी नागपूर चे केंद्र प्रमुख एच आर वाघमारे यांनी उपस्थित सर्व अधिकारी तसेच प्रशिक्षणार्थींना जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ, अहिल्याआई होळकर, सावित्रीमाई फुले, रमामाता आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती उपस्थित प्रशिक्षणार्थींमध्ये जागृत केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री हेमंत वाघमारे सर, भंडारा जिल्हा प्रकल्प अधिकारी कुमारी काजल राठोड मॅडम, प्रमुख अतिथी श्री वैभव टाकळे आणि रोशन मानकर सर, नागपूर बॅच चे प्रशिक्षणार्थी सुमित चौधरी, आकाश बर्वे, प्रफुल्ल रामटेके, अजिंक्य दिवे, निलेश शहारे, धम्यक वैद्य, दिव्यांशू कांबळे, चकार पाटील, अभिदा मेंढे, ईशा गजभिये तसेच इतर प्रशिक्षणार्थी सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नीलिमा उके मॅडम यांनी केले.
महत्वाचे म्हणजे उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) येथे नागपूर आयोजित महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष (एमएआयटीआरआय) मुंबई यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अनुसूचित जाती/जमाती) उद्योजकासाठी विशेष सामूहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत फक्त अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता अठरा दिवसीय निःशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून प्रस्तुत प्रशिक्षण हे दिनांक २८-०२-२०२३ ला सुरू झाले असून ते दिनांक १८-०३-२०२३ रोजी पर्यंत असणार आहे.
प्रशिक्षणार्थींची राहण्या खाण्याची व्यवस्था ही निःशुल्क करण्यात आलेली आहे.