BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळी-ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न विधानसभेत गाजला आमदार अनिल बाबू देशमुख यांनी मांडला प्रश्न कोंढाळी ग्रामीण रूग्णालयाला लागणारा नीधी मंजुर करण्याचे आयोग मंत्री तानाजी सावंत यांचे उत्तर….

Summary

कोंढाळी प्रतिनिधी – दुर्गा प्रसाद पांडे नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील ग्रामीण रुग्णालयाचे अपुर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी काटोल विधानसभा चे आमदार व माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे कडे अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी लागणारी विकास […]

कोंढाळी प्रतिनिधी –
दुर्गा प्रसाद पांडे

नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील ग्रामीण रुग्णालयाचे अपुर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी काटोल विधानसभा चे आमदार व माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे कडे अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी लागणारी विकास निधी ची मागणी केली आहे. सोबतच याच संबधाने ०३मार्च रोजी विधानसभा सभेत ही कोंढाळी येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम नीधी आभावी रखडला असून येथील बांधकामासाठी लागनारा नीधी ची मागणी करण्यात आली. या बाबतीत राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी कोंढाळी ग्रामीण रुग्णालयाचे अपुर्ण बांधकामासाठी लागणार्या निधी आठ दिवसात मंजुरी देण्याचे राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून विधानसभेत उत्तर देतांना सांगितले आहे.
नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखले जाते.
राष्ट्रीय महामार्ग वरील अपघात प्रवण क्षेत्रातील जखमींना ताबडतोब योग्य तो प्रथमोपचार मिळावा, तसेच कोंढाळी- मेटपांजरा सह लगतच्या वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा)तालुक्याती अनेक गावा़ंसह 54-55गावाचे नागरिकांचे आरोग्य सेवा तसेच या भागातील प्राथमिक, उच्च प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थीं आरोग्य तपासणी, वन व पोलीस खात्या चे मार्फत न्याय वैद्यकीय तपासणी, अपघाती शवविच्छेदन, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यसेवा इत्यादी आरोग्य सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आवाक्याबाहेर ची सेवा असल्याने आमदार अनिल देशमुख यांनी कोंढाळी यथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली होती. ती मागणी राज्यातील आरोग्य मंत्रालयाने 2013मधे साढे चार कोटी मंजूर करून प्रशासकीय मान्यता मिळवून घेत 17जुन रोजी भुमी पूजन ही केले होते.
: या कामासाठी मंजूर साढे चार कोटीचा खर्च होऊनही बांधकाम अपूर्ण राहिले, त्यानंतर कोविड काळात सर्व बांधकाम बंद च होते. येथील ग्रामीण रुग्णालयाचे अपुर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी जि प सदस्य सलील देशमुख यांनी ही आरोग्य मंत्रालयानेआरोग्य तानाजी सावंत यांची भेट घेऊन येथील अपुरे बांधकामासाठी नीधी मागणी केली होती. तसेच या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी आरोग्य मंत्री यांना भेटून अपूर्ण बांधकामाची माहीती दिली तसेच बांधकाम पूर्ण करण्यासाठी नीधी ची मागणी केली.त्याच प्रमाणे या महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हा प्रश्न आठ दिवसात निकाली काण्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *