बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
Summary
मुंबई, दि. २३ : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी […]
मुंबई, दि. २३ : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
०००