स्व. इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने कु पायल येरणे सन्मानित गोल्डन केअर क्लब, बंगळूर व्दारे ऑनलाईन पुरस्कार सोहळा सम्पन्न.
नागपूर कन्हान : – पासुन पुर्वेस १२ कि मी लांब असलेल्या बोरी (सिंगोरीृ) येथील शिवशक्ती अखाडा प्रमुख कु पायल येरणे ला कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील ” गोल्डन केअर क्लब ” व्दारे स्व. इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शनिवार दि.३१ आक्टोबर २०२० ला भारताची प्रथम महिला पंतप्रधान तथा आर्यन लेडीज म्हणुन जगविख्यात असलेल्या महिला स्व इंदिरा गांधी यांचा पुण्यतिथी दिना निमित्त्याने आपल्या नागपूर जिल्हा, पारशिवनी तालुक्यातील बोरी (सिंगोरी) या छोटयाश्या गावातील रहिवासी युवा नेतृत्व, शिवशक्ती आखाडा प्रमुख कु पायल येरणे (२३) यांना कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील ” गोल्डन केअर क्लब ” संस्थे मार्फत सामाजिक कार्यात आगळी वेगळी कामगिरी करून विशेष कार्य केल्या बद्दल ” स्व इंदिरा गांधी सेवारत्न पुरस्कार २०२० ” हा राष्ट्रीय पुरस्कार ऑनलाईन पद्ध तीने प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
कु पायल येरणे हिने स्व इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार प्राप्त करून आई, वडील आणि गावाचा नावलौकीक केल्याबद्दल ग्रा प बोरी (सिंगारदिप) सरपं च सुभाष नाकाडे, उपसरपंच रविंद्र दोडके, मुख्याध्यापक शांताराम जळते राज्य उपाध्यक्ष डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद पोलीस पाटील अजय ईखार सह सर्व ग्रा प सदस्य व गावक-या तर्फे अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
९५७९९९८५३५