महाराष्ट्र

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नागपुरातून १८ पीआय बदलले

Summary

नागपुर:- शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे प्रमुख संतोष खांडेकर यांची बदली वर्धा येथे झाली असून, पोलिस आयुक्तालायतील पुंडलिक भटकर यांची नागपूर ग्रामीणमध्ये बदली झाली आहे.  एकाच शहरात विहित कालावधी पूर्ण झालेल्या राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षकांच्या […]

नागपुर:- शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे प्रमुख संतोष खांडेकर यांची बदली वर्धा येथे झाली असून, पोलिस आयुक्तालायतील पुंडलिक भटकर यांची नागपूर ग्रामीणमध्ये बदली झाली आहे.

 एकाच शहरात विहित कालावधी पूर्ण झालेल्या राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी आज गुरूवारी गृहमंत्रालयाने जाहीर केली. यामध्ये नागपुरातील १८ पोलिस निरीक्षक, १६ सहायक निरीक्षक आणि १७ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे प्रमुख संतोष खांडेकर यांची बदली वर्धा येथे झाली असून पोलिस आयुक्तालयातील पुंडलिक भटकर यांची नागपूर ग्रामिणमध्ये बदली झाली आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र निकम यांची नागपूर ग्रामिणमध्ये बदली झाली असून विशेष शाखेचे सुरेश मडावी यांची मुंबई शहरात बदली झाली आहे.
 तसेच एमआयडीसीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आणि विजय जाधव यांची नागपूर ग्रामीणमध्ये बदली झाली आहे. रोशन यादव (चंद्रपूर), शैलेश संखे आणि शुभदा संखे, विक्रम गौड, महेश ढवाण (पुणे), रविंद्र माळवे (नानविज), राजेंद्र सावंत (मुंबई), विजय करे (अहमदनगर), भानूदास पिदूरकर (वर्धा), अजीत सिद (सांगली) येथे बदली झाली आहे.
वाहतूक शाखेत डीसीपी साळी यांचे रिडर दादाराम करांडे आणि गुन्हे शाखेचे किरण चौघुले यांची कोंकण परिक्षेत्रात तर गुन्हे शाखेचे पंकड धाडगे, गजानन राऊत, सचिन शिर्के यांची पिंपरी चिंचवड येथे बदली झाली आहे. 
एपीआय सुदर्शन गायकवाड आणि अनुपमा जगताप यांची पुण्यात बदली झाली आहे. मानसिंग डुबल (मुंबई), विश्‍वास भास्कर (मसुप्र), अनंत भंडे आणि अरविंद घोडके (नांदेड), विनायक पाटील (कोल्हापूर), संजय परदेशी (सोलापूर), नरेंद्र निसवाडे आणि युनुस मुलानी (लोहमार्ग, नागपूर) यांची बदली झाली आहे.

प्रवीण मेश्राम
उत्तर नागपुर प्रतिनिधी
मो.नं.९५९५५४८३११

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *