विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची तयारी असेल तर अजून नवीन ग्रंथालय बांधू- चरणसिंग ठाकूर
Summary
काटोल: प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे काटोल येथील कुंतलापूर ज्ञानार्जन केंद्रात गुणवंताचा सकार करण्यात आला. या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चरणसिंग ठाकूर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात कुतलापूर ज्ञानार्जन केंद्राची निर्मिती करीत असतांना मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद या ग्रंथालयाला […]
काटोल: प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे
काटोल येथील कुंतलापूर ज्ञानार्जन केंद्रात गुणवंताचा सकार करण्यात आला. या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चरणसिंग ठाकूर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात कुतलापूर ज्ञानार्जन केंद्राची निर्मिती करीत असतांना मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद या ग्रंथालयाला मिळेल असे वाटत नव्हते, तेव्हा आपण पुढील काळात विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची तयारी असेल तर अजून नवीन गंथालय बांधू असे बोलत होते. लवकरच विद्यार्थ्यांकरीता 25 एकरामध्ये भव्य क्रिडा संकुल बांधण्यात येईल. त्यामध्ये सर्व खेळ खेळाडूंना खेळता येईल व आपल्या भागाचा नाव लौकीक खेळाडू करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहूने म्हणून काटोल न प चे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात ग्रंथालयाला जे-जे कमी पडेल ते आपण नक्की देवू, विद्यार्थ्यांना काहीच कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे ग्रंथपाल राजेंद्र राऊत यांनी आपल्या प्रास्ताविकात ग्रंथातलयाविषयी माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी या ग्रंथालयात ग्रामीण भागातील बहु संख्य विद्यार्थी अभ्यास करण्याकरिता येत असून त्यांना पास ची सुविधा मिळायला पाहिजे व परीवहन महामंडळाची पास देण्याकरीता वय मर्यादा ही 24 वर्ष असून ती वाढून 30 वर्ष व्हायला पाहिजे जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरामध्ये येऊन अभ्यास करता येईल व तो स्पर्धेच्या युगात पुढे येईल, या प्रसंगी ग्रंथालयातील विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केले त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला संतोष आंदळे यांनी डिपारमेल परीक्षेमधून PSI या परीक्षेमध्ये यश संपादन केले. तसेच हर्षल वरुडकर, निलेश रेवतकर यांची आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल व डॉ सुचिता रविंद्र निसाळ यांना ग्रंथालय व
माहिती शास्त्रामध्ये phd मिळाल्याबद्दल
तसेच श्रीमती सरोज नासरे, भिष्णूर यांनी ग्रंथालयाला 8000 पुस्तके भेट म्हणून दिली म्हणून शाल, श्रीफळ व भेट वस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मंचावर काटोल न.प. चे अभियंता काळे , हिरुडकर साहेब, गौरखेडे , अशोकरावजी काळे, ओंकार भोयर, आकाश मेश्राम उपस्थित् होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता ग्रंथालयाचे सहाय्यक ग्रंथपाल राजेश चौधरी, माधवी महल्ले, सोनल भोयर, स्मिता बागडे, कुणाल मुळे, महेंद्र गजभिये यांनी मोलाची कामगीरी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मयूरी उमप तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. सुचिता निसाळ यांनी केले.