हिवाळी अधिवेशन कालावधीत मुंबई स्थित मुख्य सचिवांचे कार्यालय नागपूर शिबीर कार्यालयात
मुंबई, दि. ७ : विधिमंडळाचे सन २०२२ चे तिसरे (हिवाळी) अधिवेशन नागपूर येथे १९ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. या अधिवेशन कालावधीकरीता १५ डिसेंबर पासून मुंबई स्थित मुख्य सचिवांचे कार्यालय नागपूर येथील शिबीर कार्यालयात सुरू करण्यात येत आहे.
सर्व मंत्रालयीन विभाग, मुंबई यांचे मुख्य सचिवांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येणारे धारिका, टपाल, निवेदन १४ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजल्यापासून स्वीकारण्याचे बंद करण्यात येईल. मुख्य सचिव कार्यालयाला सादर करावयाची कागदपत्रे, धारीका, टपाल इत्यादी १५ डिसेंबर पासून ते अधिवेशन संस्थगित होईपर्यंतच्या कालावधीमध्ये मुख्य सचिवांचे शिबीर कार्यालय, हैद्राबाद हाऊस, नागपूर येथील कार्यालयात स्वीकारण्यात येतील.