महाराष्ट्र सातारा हेडलाइन

सीमा प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात मांडण्याच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा

Summary

सातारा दि. २ – महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या संदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दिल्लीतील राज्य शासनाचे सीनियर कौन्सिल श्री. वैजनाथन, श्री. त्रिवेदी, राज्य शासनाचे वकील शिवाजी जाधव आणि इतर सर्व सीनियर कौन्सिल […]

सातारा दि. २ – महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या संदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दिल्लीतील राज्य शासनाचे सीनियर कौन्सिल श्री. वैजनाथन, श्री. त्रिवेदी, राज्य शासनाचे वकील शिवाजी जाधव आणि इतर सर्व सीनियर कौन्सिल यांच्याबरोबर दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये न्यायालयीन व कायदेशीर बाबी आहेत त्या राज्याच्या बाजूने कशा पद्धतीने अतिशय प्रभावीपणे मांडायच्या त्याबाबत सविस्तर चर्चा झाली.  याविषयी सिनियर कौन्सिल श्री. वैजनाथ यांना सर्व वकील यांनी सविस्तर माहिती दिली. या प्रकरणी न्यायालयीन बाबी या अतिशय प्रखरपणाने व प्रभावीपणे मांडायचे आहेत.   याबाबत लागणारी सर्व  अधिकची माहिती राज्य शासनाकडून तातडीने दिल्लीतील वरिष्ठ वकीलांना पूरविण्यात येत आहे.  कोणताही छोटासा मुद्दा देखील राहू नये याची खबरदारी घेण्याबाबत या बैठकीत सूचना देण्यात आल्या. तसेच या प्रश्नावरील तांत्रिक बाबींची चर्चा करुन राज्याच्या बाजूचे सर्व मुद्दे कायदेशीर आधारासह सुस्पष्टपणे मांडण्याविषयी चर्चा करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीवेळी राज्य शासनाची बाजू अतिशय काळजीपूर्वक तसेच प्रभावीपणे मांडण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *